कुत्रा चावला म्हणून दिली चक्क कोरोनाची लस !

 


कुत्रा चावला म्हणून दिली चक्क कोरोनाची लस !

(  राज्य रिपोर्टर ) वृत्तसेवा  : कुत्रा चावल्यानंतर रेबीजचे इंजेक्शन दिले जाते. पण, एका आरोग्य कर्मचाऱ्यांनी कुत्रा चावलेल्या व्यक्तीला चक्क कोरोनाची लस टोचली आहे. ही घटना झारखंड या पुलामु जिल्ह्यात घडली आहे. येथील आरोग्य केंद्रात राजू नावाचा एक माणूस कुत्रा चावल्याची तक्रार घेऊन आला होता. तिथे उपस्थित एका आरोग्य कर्मचाऱ्यांला त्याने अँटीरेबिज इंजेक्शन देण्याची विनंती केली. पण, त्या कर्मचाऱ्याने राजुला कोरोनाची लस दिली विशेष म्हणजे राजू यांच्या कोरोनाच्या दोन्ही लसी आधीच झाल्या आहेत. पण, कर्मचाऱ्याने निष्काळजीपणाने हि तिसरी लस त्यांना टोचली. झारखंडच्या तीन सद्यसदीय समिती स्थापन केली असून या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. या समितीच्या अहवालानंतर संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

Post a Comment

0 Comments