एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

 




 एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या 

◾राज्यभर संप सुरू असताना तीन दिवस कोणालाही भेटले नाही अन्...

◾चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी आगारातील घटना

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनावर अद्यापही ठोस भुमिका घेतली नाही. त्यामुळे संप अधिक तिव्र झाला आहे. राज्यातील काही एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. यावर राज्य सरकारवर सर्वत्र टिका होत असतांनाच पुन्हा एका कर्मचाऱ्याने आपले जिवन संपविले. राज्यात कर्जबाजारीपणामुळे आणि आर्थिक नुकसान यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही सुरू आहेत. यात आता एसटी कर्मचाऱ्यांची भर पडली आहे. राज्यात आणखी एका एसटी कर्मचाऱ्यांने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. राज्यभर सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, त्याला कुठेतरी आक्रमक वळण लागल्याचं पाहायला मिळतं. गेल्या अनेक दिवसांमध्ये अनेक एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या समोर आल्या. आजही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांना आपले जीवन संपवले. यामुळे एकच खळबळ उडाली.

राज्यातील आणखी एका एसटी कर्मचाऱ्याने संपवलं जीवन, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी आगारातील घटना

ब्रह्मपुरी एसटी आगारातील वाहतूक नियंत्रकाने आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सत्यजित ठाकूर असं या युवा एसटी कर्मचाऱ्याचं नाव आहे. ब्रह्मपुरी इथं शहरातल्या राहत्या रूमवर विष प्राशन करून त्यांनी आपलं जीवन संपवलं. या घटनेबद्दल अधिक माहिती अशी की, गेल्या तीन दिवसापासून सत्यजित हे कोणालाही भेटले नव्हते. त्यामुळे ते नेमके कुठे आहेत? असा सगळ्यांचाच शोध सुरू होता. आज अचानक शेजाऱ्यांनी दार ठोठावलं, पण कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी दार तोडलं. यावेळी धक्कादायक सत्य समोर आलं. रूममध्ये सत्यजित ठाकूर यांचा मृतदेह सापडला. तात्काळ याची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. संप आणि राज्य सेवेत विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला चंद्रपुरात शंभर टक्के प्रतिसाद देण्यात आला आहे. पण सत्यजित ठाकूर यांच्या आत्महत्येमुळे हे वातावरण चिघळण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनावर अद्यापही ठोस भुमिका घेतली नाही. त्यामुळे संप अधिक तिव्र झाला आहे. राज्यातील काही एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. यावर राज्य सरकारवर सर्वत्र टिका होत असतांनाच पुन्हा एका कर्मचाऱ्याने आपले जिवन संपविले.

ठाकूर यांच्या आत्महत्येमुळे चंद्रपूरातील आंदोलन तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. खरंतर, शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबायचं नाव घेत नाही. पण आता एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या थांबतील का? असा प्रश्न आता राज्याला पडला आहे.












Post a Comment

0 Comments