एस. टी महामंडळ कामगारांच्या संपाला भीम आर्मी भारत एकता मिशन वरोरा तालुकाचा जाहीर पाठिंबा

 



एस टी महामंडळ कामगारांच्या संपाला भीम आर्मी भारत एकता मिशन वरोरा तालुकाचा जाहीर पाठिंबा

◾एसटी महामंडळाचे महाराष्ट्र सरकारमध्ये विलिनीकरण करणयात यावे

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : एसटी महामंडळाचे महाराष्ट्र सरकारमध्ये विलिनीकरण करणयात यावे, या मागणीसाठी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या बेमुदत संपाला भीम आर्मी भारत एकता मिशन संगठना तर्फ पाठिंबा दिला आहे.

भीम आर्मी संगठनोच्या जिल्हा प्रमुख भाई शंखर मून आणि भीम  आर्मीच्या वरोरा तालुका प्रमुख भाई शुभम गवई यांच्या नेतृत्वात कामगारांच्या आंदोलन मंडळाला नुकतीच भेट दिली व मागण्याबाबत संपकरी कामगारांशी सविस्तर चर्चा करून आपल्या संगठनोच्या संपूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे वेतन व भत्ते अतिशय कमी असून महागाईच्या काळात एवढ्या अल्प वेतनात कामगारांना आपल्या कुटुंबाचे पालण करणे अतिशय कठीण झाले आहे.महामंडळाचे वेतन व त्या मोबदल्यात कामगारांकडून दिली जाणारी सेवा ही तर एक प्रकारची  सरकारी वेठबिगारी आहे, असा गंभीर आरोप भाई शंकर मून यानी या भेटीदरम्यान केला.

महाराष्ट्र सरकारमध्ये महामंडळाचे विलीनीकरण करण्याची मागणी अतिशय रास्त असून, त्यामुळे फक्त कामगारांनाच नाही तर सर्वसामान्य प्रवाशांना सूध्दा चांगल्या सोयी मिळतील, अशी आशा मून यांनी व्यक्त केली व शासनाने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन महामंडळाचे सरकार मध्ये विलीनीकरण करावे अशी जोरदार मागणी केली आहे. कामगारांचे आंदोलन स्वयंस्फूर्त असून त्याकडे शासनाने दुर्लक्ष करू नये, असा इशारा यावेळी देण्यात आला. या भेटीदरम्यान भीम आर्मी भारत एकता मिशन संघटनेचे जिल्हा संघटक भाई गौतम गेडाम भद्रावती तालुका प्रमुख भाई अन्वर शेख, चंद्रमानी   गाजबे, पिंटू मेश्राम , स्वप्नील कुंभार, योगेश खोब्रागडे यांचेसह महामंडळाचे कामगार पुढारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.











Post a Comment

0 Comments