प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्काराचे वितरण

 



प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्काराचे वितरण


सोलापूर, अकलूज ( राज्य रिपोर्टर ) : आपण केलेल्या उल्लेखनीय  कार्याचा आढावा घेत आपणास दिलेल्य पुरस्कारामुळे पुढील कार्य करण्याची प्रेरक उर्जा मिळणार असून यापुढेही आपल्याकडून समाजोपयोगी विधायक कार्य घडावे अशी अपेक्षा शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी पुरस्कार वितरण प्रसंगी व्यक्त केली.

अकलूज नगरपरिषदेच्या सभागृहात भारतीय दलित संसद व प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्काराचे वितरण माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील व देवन्या शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यास भारतीय दलित संसदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रा. अंबादास सगट, माजी सरपंच पायल मोरे, पत्रकार चंद्रकांत कुंभार, शशिकांत कडबाने, निनाद पाटील, अरुण खंडागळे, गणेश वसेकर, संजय साठे, संजय लोहार, राहुल जगताप, महावीर खंडागळे यासह अमोल चव्हाण, अजित साठे, राजेंद्र वाघमारे, बाळासाहेब गायकवाड, करुणा धाईंजे,नानासाहेब नाईकनवरे, राजू लोखंडे, दादासो शेलार, बापू खंडागळे, सद्दाम काझी, किरण खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार सामजिक क्षेत्रातील एस. आर. तोगरे, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. गणेश दिनकर घाडगे, पोलिस गणेश हिरासिंग पिंगुवाले, बालआश्रमच्या जयश्री लक्ष्मण बागडे, वृद्धाश्रमाचे ह.भ.प. दशरथ महाराज मोतीराम (महाडिक)देशमुख,  खेळाडू शुभम प्रकाश क्षिरसागर यांना देण्यात आला. तर  विशेष पुरस्कार : सामजिक प्रकाश ज्योतीराम चोपडे,  रामचंद्र लक्ष्मण साठे,  डॉ. मालिकार्जुन रामलिंग कुंभार, ॲड. धनंजय शिवाजी बाबर, ॲड.तुकारम बळीराम राऊत, महिला पोलिस नाजनीन रज्जाक तांबोळी, कलाकार कु.अर्चना गोमे.  सर्पमित्र रामपाल खंडागळे यांना देण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय नाईकनवरे यांनी केले. तर भारतीय दलित संसदेचे अध्यक्ष व आयोजक सोमनाथ खंडागळे यांनी आभार मानले.



Post a Comment

0 Comments