बल्लारपूर शहरातील लक्ष्मी नृसिह नागरी सहकारी संस्थेचा उपक्रम पोलीस स्थानकात गरीब मुलांसोबत साजरा केला दिवाळीचा आनंदोत्सव
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : दिवाळी हा वर्षातील महत्वाचा मोठा सण उत्सव असतो या निमित्ताने प्रत्येक कुटुंबीय आपल्या मुलांसोबत सण साजरा करतो मात्र मागील २ वर्षाच्या काळात कोरोना संक्रमणाच्या मुळे नागरिकांनी दिवाळी घरीच साजरी केली मात्र सद्यस्थितीत कोरोना निर्बंधात शिथिलता मिळाल्यामुळे अनेक सामाजिक संस्था दिवाळीच्या निमित्ताने गरीब मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा प्रयत्न करीत आहे.
बल्लारपूर शहरातील लक्ष्मी नृसिह नागरी सहकारी संस्था च्या माध्यमातुन बल्लारपूर पोलीस स्टेशन मध्ये " धनतेरस " च्या निमित्ताने सायंकाळच्या सुमारास ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर मागील असलेल्या शांती नगरातील गरीब मुलासोबत दिवाळीचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला या निमीत्ताने मा.उमेश पाटील, पोलीस निरीक्षक बल्लारपूर, माजी नगरसेविका वर्षा सुंचुवार, दृष्टिहीन शिक्षक सतीश शेंडे, देवेंद्र वाटकर, विकास राजूरकर ई ची प्रामुख्याने उपस्थिती होती बल्लारपूरातील शांती नगर एक गरीब वस्ती म्हणून ओळखली जाते दिवाळीच्या निमित्ताने अशा गरीब मुलांना नीट २ वेळच भोजन मिळणेही अवघड असते त्यामुळे या विषयाला लक्षात घेऊन लक्ष्मी नृसिह संस्थेने या परिसरातील लहान मूल व महिलांना मिठाई व अल्पोपहार देऊन या गरीब मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा एक छोटासा प्रयत्न केला यावेळी अतिथीनी मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाचं संचालन श्रीनिवास सुंचूवार यांनी केलं.


0 Comments