बल्लारपूर पोलिसांच्या ताब्यात साडे ४ लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यासह महिलांचा एक समूह
◾७ महिलांचा एक समूह अटक
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर शहरात वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीत पार्श्वभूमीवर बल्लारपूर पोलिसांनी एका महिलांच्या समूहाला अटक करून वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला यासंदर्भात दयानंद उपासे पोलीस कर्मचारी चंद्रपूर यांच्या तक्रारीवरून ७ नोव्हेम्बरला चंद्रपुरातुन ७ महिलांसह ९ तोळे सोन्याचे दागिने, एक चैन, एक हार, एक मंगळसूत्र, व २ राणी हार या सर्व दागिन्यांची अंदाजित किंमत साडे ४ लाख रु असल्याची माहिती आहे या माहितीवरून पोलिसांनी अटक केलेल्या महिला अनिता दादाजी लोंढे ( ४७ ), नयना एकनाथ मानकर ( २१ ), रीमा जोगेंद्र मानकर ( ३२ ), नम्रता चैतराम उखाडे ( २५ ), प्रिया प्रदीप हातगडे ( २८ ), छाया रांनु मानकर ( ४५ ), सोनी सोहन उखाडे ( ३० ) सर्व रा.नागपूर, अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत निवासी असून या सर्व महिला समूहाच्या माध्यमातून वर्धा, हिंगणघाट, नागपूर, चंद्रपूर, बल्लारपूर ई ठिकाणीं लहान मुलांच्या मदतीने एसटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांना आपले शिकार बनवितात.
या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १ नोव्हेम्बरला चंद्रपूर वरून लातूरला जाण्यासाठी दयानंद उपासे आपल्या पत्नीसह आसिफाबाद बस मध्ये बसले प्रवास करताना मोबाईलवर व्यस्त असल्यामुळे एक दुसरी महिला शेजारी येऊन बसली व सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ करून बल्लारपूर बसस्थानकावर उतरली मात्र दागिन्यांची चोरी झाल्याची माहिती राजुरा बसस्थानका दरम्यान कळताच परत बल्लारपूर शहरात येऊन पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली या तक्रारीवरून बल्लारपूर येथील सपोनि रमीज मुलानी आपल्या चमूसह तपास करीत असताना गुप्त सूत्राच्या माहितीनुसार या गुन्ह्यातील एक महिला चंद्रपूरात असल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी सुचनेच्या आधारावरून सदर महिलांना अटक केली व सविस्तर विचारपूस केल्यानंतर नागपुरातील अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रामेश्वरी येथून अन्य महिलांना अटक केली व त्यांचेकडून ९ तोळे सोन्याच्या दागिन्यासह साढे ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला यासर्व महिलांना न्यायालयात हजर केले असता ७ नोव्हेम्बर ते ११ नोव्हेम्बर पर्यंत पीसीआर मिळाला यापुढील तपास उमेश पाटील पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रमीज मुलानी, माथनकर, संतोष दांडेकर, श्रीनिवास वाभीटकर, कुमरे मेजर, संध्या, सीमा व अन्य पोलीस कर्मचाऱ्यानी कामगिरी केली आहे.


0 Comments