एव्हरेस्ट वीरांच्या कुटुंबियांची नोकऱ्या देणे मागणी - माजी आमदार निमकर



एव्हरेस्ट वीरांच्या कुटुंबियांची नोकऱ्या देणे मागणी - माजी आमदार निमकर

◾एव्हरेस्ट शिखर सर करून भारताचा तिरंगा फडकविण्याचा पराक्रम

राजुरा ( राज्य रिपोर्टर ) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या एव्हरेस्ट शिखर सर करून भारताचा तिरंगा फडकविण्याचा पराक्रम केलेल्या कोरपना व जिवती या अतिदुर्गम, नक्षलग्रस्त आदिवासीबहुल तालुक्यातील 5 आदिवासी रत्नांना दिलेल्या अश्वासनानुसार गृह विभागात नोकऱ्या देण्याकरिता राज्याचे गृह मंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांना त्यांच्या कार्यालयात मुंबई येथे दि.26.10.2021 ला विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष, माजी मंत्री आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी निवेदन दिले. एव्हरेस्ट वीरांच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरीब असल्यामुळे त्यांना नोकऱ्या देणे आवश्यक असल्याची बाब माजी आमदार निमकर यांनी मंत्रीमहोदयांच्या निदर्शनास आणून दिली. या मागणी संबंधाने सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे माननीय मंत्रीमहोदयांनी सांगितले. या चर्चे प्रसंगी गृह विभागाचे प्रधान सचिव मा. मनुकुमार श्रीवास्तव व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments