लखीमपूरखीरी शेतकरी हत्यांचा राजुरा युवक काँग्रेसकडून निषेध

 

लखीमपूरखीरी शेतकरी हत्यांचा राजुरा  युवक काँग्रेसकडून निषेध

🔹राजुरा शहराचे नगराध्यक्ष अरुण भाऊ धोटे यांच्या नेतृत्वात 

राजुरा ( राज्य रिपोर्टर )  : राजुरा विधानसभा मा. आमदार सुभाष धोटे यांचे मार्गदर्शनात राजुरा शहरातील नगराध्यक्ष अरुण भाऊ धोटे यांचे नेतुत्वात राजुरा विधानसभा कांग्रेस च्या वतीने उत्तर प्रदेश राज्यातील लखीमपूरखीरी येथे उपमुख्यमंत्री यांना काळे झेंडे दाखवून विरोध करण्यासाठी उभे असलेल्या शेतकऱ्यांना योगी सरकारातील मंत्र्याच्या मुलाच्या भरधाव गाडीने गाडीखाली चिरडून शेतकऱ्यांच्या हत्या घडवून आणल्या. या संदर्भात दोषींवर कडक कारवाई करून त्यांना फाशी देण्यात यावी, काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना मृतक शेतकरी कुटुंबीयांना भेटून सांत्वन करण्यासाठी परवानगी देण्यात यावी. पोलीस प्रशासनाकडून होत असलेली लोकशाहीची क्रूर चेष्टा थांबविण्यात यावी अशी मागणी करीत राजुरा विधानसभा युवक काँग्रेस व बहुसंख्येने उपस्तिथ कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या वतीने संविधान चौक राजुरा येथे सायंकाळी ७.०० वाजता शेतकरी हत्यांचा निषेध करण्यात आला.

        या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, उपअध्यक्ष सुनील देशपांडे, सं. गां. नि. यो. अध्यक्ष साईनाथ बतकमावार, नगरसेवक हरजितसिंग संधू, आनंद दासरी, राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष एजाज अहमद, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष शेंडे, मतीन कुरेशी, संदीप आदे यासह अनेक कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थीत होते.




Post a Comment

0 Comments