मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करा - शिवसेना तर्फे निवेदन
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपुर शिवेसेना चे माननीय श्री. सिक्की भैय्या यादव ( उपजिल्हा प्रमुख व नगरसेवक बल्लारपुर ) यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय श्री. प्रकाश भाऊ पाठक ( तालुका प्रमुख ), बाबा शाहू शहर प्रमुख बल्लारपुर शिवसेना तसेच महिला आघाडी च्या सौ. कल्पना ताई गोरघाटे ( महिला उप जिल्हाप्रमुख ) व मीनाक्षी ताई गलघट यांच्या प्रमुख उपस्थितीत, अधिवक्ता प्रणय भाऊ काकडे ( शहर समन्वयक बल्लारपुर शिवसेना ) यांच्या नेतृत्वात शिवसेना तर्फे उप मुख्याधिकारी श्री. जयवंत कातकर साहेबांना मोकाट फिरणाऱ्या कुत्रांनाचा बंदोबस्त करण्यास निवेदन देण्यात आले। या मोकाट फिरणाऱ्या कुत्रांना त्वचा रोग मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे आणि या विकारामुळे गल्ली बोंड्यात खेळणारे लहान मुले असुरक्षित आहे। त्या मुलांना हा रोग होण्याची जाणीव घेता प्रतिबंधात्मक उपचार गरजेचा भासुण बल्लारपुर शिवसेना तर्फे रोगाची रोकथाम करण्यास यथोचित उपचार करण्यास विनंती करण्यात आली। निवेदन सादर करताना शेख युसूफ उप शहर प्रमुख व अनुदान योजना समिती सदस्य बल्लारपुर, सोनु श्रीवास ,डंबारे, बॉबी कादासी, संतोष दीक्षित तसेच इतर शिवसैनिक व बल्लारपूर रहिवासी हजर होते.







0 Comments