बल्लारपूर पोलिसांचा रूट मार्च : सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर शहरात विविध सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने बल्लारपूर पोलिसांनी आज शहरातून रूट मार्च काढला याद्वारे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या वृत्तीवर कायदाचा वचक रहावा असा संदेश देण्यात आला सदर रूट मार्च बल्लारपूर पोलीस स्टेशन, गोल पूल, आम्रपाली चौक, श्रीटॉकीज,महात्मा गांधी पुतळा,आसमा हॉटेल,सब्जी मंडी, गांधी चौक,माता मंदिर,गणपती विसर्जन मार्गाने बल्लारपुर पोलीस स्टेशन पर्यंत काढण्यात आला. सदर रूट मार्च 4 :15 वा. सुरू करुन 5 : 50 वा समाप्त करण्यात आला. सदर रूट मार्च मध्ये पोलिस स्टेशन येथील 06 अधीकारी.
सदर रूट मार्च उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उमेश पाटील पोलीस निरीक्षक बल्लारपुर यांच्या नेतृत्वात काढण्यात आला असून या रूट मार्च मध्ये सपोनि विकास गायकवाड, सपोनि रमीझ मुलाणी, सपोनि रासकर, पोउनी अनिल चांदोरे,पोउनी टेंभुर्ने यांच्या सह बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये असलेले 44 पोलीस अमंलदार होमगार्ड सैनिक 33 सहभागी झाले होते.












0 Comments