पाण्यात बुडून शेतकरी तरुणाचा मृत्यू
◾अंबुजा सिमेंट गेट उपरवाही येथील घटना
कोरपना ( राज्य रिपोर्टर ) : अंबुजा सिमेंट गेट उपरवाही येथील शेतकर्यांच्या मुलाने शेतात फवारणी साठी शेतालगतच्या नाल्यातुन बैलबंडीने पाणी नेत असताना बैलगाडी पाण्यात पलटी झाल्यामुळे तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पवन किसन मटाले वय ( १७ ) रा. उपरवाही असे मृत तरुणाचे नाव आहे. उप्परवाही येथील शेतकरी किसन मटाले व त्यांच्या मुलगा पवन हे १२/९/२०२१ ला सकाळी 10 वाजता शेतात फवारणी साठी बैलगाडी वर ड्रम घेऊन नाल्यावर पाणी भरण्यासाठी गेले असता बैलगाडी सुलार होऊन खोल पाण्यात बुडाली व मुलगा बुडुन मरण पावला वडील पोहून बाहेर निघाले.









0 Comments