आमदार किशोर जोरगेवार यांच्या मध्यस्ती नंतर त्या युवतीचे पार्थिव कुटुबीयांनी चौकातून हलविले

 


आमदार किशोर जोरगेवार यांच्या मध्यस्ती नंतर त्या युवतीचे पार्थिव कुटुबीयांनी चौकातून हलविले

🔸तीन तास चालले आंदोलन, आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आर्थिक मदत 

   चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) :   युवकाने चाकुने हल्ला केल्याने जखमी झालेल्या 18 वर्षीय युवतीचा उपचारा दरम्याण मृत्यू झाला. आज दुपारला तिचे पार्थिव शरीर बाबूपेठ येथील नेताजी चौकात आणण्यात आले यावेळी आरोपीला फाशी दया या मागणीसह इतर मागण्यांना घेवून कुटुबींयासह बाबूपेठ येथील नागरिकांनी आंदोलन सुरु केले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी नेताजी चौकात जाऊन नातलगांशी संवाद साधत मध्यस्ती केली. तसेच यावेळी आर्थिक मदत करत कुटुंबीयांच्या मागण्या एकून घेत त्या पूर्ण करण्याच्या दिशेने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर नातलगांनी पार्थिव शरीर तिथून हलवत अंत्यविधी करीता घरी नेले.

        एकतर्फी प्रेमातून विवाहीत असलेल्या 35 वर्षीय प्रफुल आश्राम या युवकाने बाबुपेठ येथील 18 वर्षीय युवतीवर चाकुने प्राणघातक हल्ला केला काही दिवसांच्या उपचारा नंतरही डाॅक्टरांना सदर युवतीने प्राण वाचविता आले नाही. विषेश म्हणजे सदर युवकाने या आधी युवतीला जिवे मारण्याची धमकी दिली होती. यावेळी युवतीने रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र  पोलिसांनी आरोपी युवकावर कोणतीही कार्यवाही केली नाही. असा आरोप कुटुबीयांनी केला आहे. दरम्याण आज मृत युवतीचे पार्थिव शरीर बाबुपेठ येथील नेताजी चौकात ठेवून नातलगांसह बाबूपेठ वासियांनी आंदोलन सुरु केले. सदर आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, प्रकरण जलत गतीच्या कोर्टात चालविण्यात यावे, दोषी पोलिस अधिकारी, कर्मचा-यांवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. जवळपास तिन तास हे आंदोलन सुरु राहिले. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता येथे मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. याची माहिती आमदार किशोर जोरगेवार यांना कळताच त्यांनी सदर ठिकाण गाठून मध्यस्ती केली. यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनाही बोलाविण्यात आले. आ. जोरगेवार यांनी कुटुंबीयांशी चर्चा करत त्यांच्या मागण्या एकून घेतल्या तसेच यावेळी त्यांनी कुटुंबाला आर्थिक मदत केली. सदर प्रकरण जलत गतीच्या कोर्टात चालविण्यासाठीची प्रक्रिया पुर्ण करण्यात येईल, शासणातर्फेही पिडीत कुटुंबाला मदत मिळण्यासाठी पाठपूरावा करील, चौकशी करून दोषी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येईल, बाबुपेठ येथे पोलिस चौकी सुरु करण्यात येईल असे आश्वासन यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले. त्यानंतर कुटुंबीयांनी युवतीचे पार्थिव नेताजी चौकातून हलवून अंत्यविधीच्या प्रक्रियेकरीता घरी नेले.






Post a Comment

0 Comments