राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या चंद्रपूर शहरातील इंदिरा नगर, क्रिष्णा नगर व संजय नगर येथे प्रवासी निवारा उभारण्यात यावा, यंग चांदा ब्रिगेडची मागणी, मनपा आयुक्तांना निवेदन
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : प्रवाशांची होत असलेली गौरसोय लक्षात घेता राष्ट्रिय महामार्गालगत असलेल्या चंद्रपूर शहरातील इंदिरा नगर, क्रिष्णा नगर व संजय नगर येथे प्रवासी निवारा उभारण्यात यावा अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असून सदर मागणीचे निवेदन महानगर पालिका आयुक्त राजेश मोहिते यांना देण्यात आले आहे.यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, संघटक आनंद इंगळे, नरेश आश्राम, रुपेश मुलकावार, नितेश बोरकूटे, वसीम कुरेशी, सतीश सोनटक्के आदिंची उपस्थिती होती.
चंद्रपूर शहरामधून चंद्रपूर - गडचिरोली ते छतिसगड जाणारा ९३० क्रंमाकाचा प्रवासी राष्ट्रीय महामार्ग आहे. या मार्गावर चंद्रपूर शहरातील इंदिरानगर, क्रिष्णानगर व संजयनगर या अगदी रोडलगत वसलेल्या वस्त्या आहे. या परिसरातील नागरिकांना चंद्रपूर शहरात किंवा गडचिरोली, छतिसगड या ठिकाणी जायचे असल्यास सदर रोडलगत प्रवासी वाहनांची वाट पाहत ताटकळत तासोनतास उभे राहावे लागते आहे. येथे बसण्याची स्वतंत्र व्यवस्था नसल्याकारणाने वृद्ध नागरिक, गरोदर स्त्रिया, लहान बालके यांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. सदर परिसरात प्रवासी निवारा ची सोय नसल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामूळे येथे एक अधिकृत प्रवासी निवारा उभारल्यास प्रवाश्यांना उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये होणारा नाहक त्रास कमी होउ शकतो त्यामूळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी येथे प्रवासी निवारा उभारण्यात यावा अशी मागणी सदर निवेदनाच्या माध्यमातून यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने महानगर पालिका आयुक्त राजेश मोहिते यांना करण्यात आली आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकत्र्यांशी मनपा आयुक्तांनी सदर मागणी संदर्भात सकारात्मक चर्चा केली आहे.










0 Comments