बल्लारपूर बामनी राजुरा रोड वर भीषण अपघात,दोन गंभीर, एक किरकोळ जखमी
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर बामनी ते राजुरा रोडवर कंटेनर क्र. MH 49 - 0262 जात असताना रस्त्यातील एका मोठ्या खड्ड्यात चाक गेल्याने चालकाचे संतुलन बिघडले.
व एका अल्टो कार क्र. MH 40 2813 या चार चाकी वाहनाला आदळला. त्यातील गोविंद सोनी ( 52 ) रा. चंद्रपूर , दुसरा आकाश बोन्देले ( 35 ) रा.चंद्रपूर गंभीर जखमी झाले. या अपघातात मारोती स्विफ्ट डिझायर क्र. MH 33 A 1987 सुध्दा अल्टो ला आदळली. त्यात सुजाता ताकसांडे ( 40 ) रा. चंद्रपूर किरकोळ जखमी झाली. वास्तविक पाहता हा अपघात सार्वजनीक बांधकाम विभाग च्या दुर्लक्ष तेने झाला असा दिसते. या पूर्वी सुद्धा अनेक अपघात या ठिकानी घडले. आणि बरेच गंभीर झाले. परंतु सार्वजनीक बांधकाम विभाग या मार्गाकडे दुर्लक्षाने अपघात होत आहे. घटनेचा पुढील तपास उमेश पाटील पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक रमीझ मुलानी तपास करीत आहेत.











0 Comments