चोपडा वासियांना कोरोनमुक्त अभियानाचा सलाम...आर्थिक सोबत रक्ताची व पलाझ्माचीही मदत.....
डॉ. दादासाहेब डॉ. सुरेश जी पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने चोपडा कोविड रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप
चोपडा (राज्य रिपोर्टर) : चोपडा येथे कोरोणामुकत अभियान अंतर्गत चोपडा येथील सेवा क्लिनिक येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन चोपडा येथील धन्वंतरी स्वर्गीय दादासाहेब डॉ. सुरेश जी पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन ने करण्यात आला.यावेळेस प्रतिमा पूजन प्रांत अधिकारी सुमित शिंदे,तहसीलदार अनिल गावित, डॉ. मनोज पाटील,डॉ. प्रदीप लासुरकर,डॉ. गुरुप्रसाद वाघ यांचे हस्ते करण्यात आले. यावेळेस एकूण बावीस रक्त दात्यानी रक्तदान केले व सहा प्लाझ्मा डोनर यांनी रक्त तपासणी करून दानाची तयारी दर्शवली.यासाठी दिव्यांक सावंत,स्वप्नील महाजन,कुलदीप पाटील,दत्तात्रय पाटील,प्रतीक पाटील,आविष्कार चव्हाण,निलेश चव्हाण, मनोज बारेला,एस टी पाटील नितीन पाटील,पंकज नलावडे,सुनील पाटील ,स्नेहल पाटील,यांनी डॉ. रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन केले.
तसेच डॉ. दादासाहेब डॉ. सुरेश जी पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने चोपडा कोविड रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
चोपडा येथे ऑक्सिजन प्लान्ट निर्मिती साठी चोपडा तालुका आजी माजी सैनिक सेवाभावी संस्थेच्या वतीने ₹४५९२७ /- रक्कमेची भरीव संस्थेच्या वतीने उपाध्यक्ष श्री.गोपाळ सोनवणे सचिव श्री.संदिप बडगुजर सदस्य श्री. किशोर पाटील,सुभाष शिरसाठ, पंकज पाटील,चंपालाल पाटील, शिवदास अहिरे व रवि सोनवणे यांनी प्रांताधिकारी कडे सुपूर्द केली त्यामुळे प्लांट साठी एकूण ₹ १०,१७,६३८/-...जमा झालेत.
यावेळेस एस बी पाटील,संजीव बाविस्कर,नगरसेविका सुप्रिया सणेर, प्रा.कांतीलाल सनेर,रमाकांत सोनवणे,जितेंद्र पाटील,अनिल पाटील, दीपक पाटील,सुनील महाजन,सी एस पाटील,मयुर शिंदे,साबीर शेख, आरिफ शेख, प्रा. सुनील पवार,भुऱ्या दादा जहागीरदार,जवर्या शेख,पत्रकार संजय बारी,उमेश नगराळे,गणेश बेहरे हे हजर होते....




0 Comments