परिचारीका दिनी हंसराज अहीर यांचे व्दारा राजुरा ,गोंडपीपरी, चंद्रपूर येथील कोविड रुग्णालयातील परिचारीका भगिनींचा सन्मान व रुग्णालयास फ्लो मीटर वितरण

 

परिचारीका दिनी हंसराज अहीर यांचे व्दारा  राजुरा ,गोंडपीपरी, चंद्रपूर  येथील कोविड रुग्णालयातील परिचारीका भगिनींचा सन्मान व रुग्णालयास फ्लो मीटर वितरण

✳️परिचारीकांची सेवा ही महानतेची प्रतिक - हंसराज अहीर 

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : परिचारीकांचे रूग्णसेवेतील कार्य नेहमीच अत्यंत महान राहीले आहे. त्यांच्या या सेवाकार्याचे ऋण चुकविने कुनालाही शक्य नाही.

 कोरोनाच्या संकटकाळात अत्यंत   धिरोदात्तपणे, कर्तव्यपरायणतेने रूग्णांची सातत्याने सेवा करीत राष्ट्रकार्यात योगदान देणाऱ्या  तमाम परिचारीका पुज्यनीय असून त्यांच्या  या अविरत रूग्णसेवेच्या ऋणाचा सन्मान करने हे सर्वांचे आद्यकर्तव्य असल्याची भावना पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी परिचारीका दिनानिमित्य परिचारीका भगिनींचा सन्मान करतांना व्यक्त केली. 

 दया व सेवेची प्रतिकृती असलेल्या व आधुनीक काळातील सेवा कार्याच्या जन्मदात्या ल्फारेंस नाईटींगेल यांच्या जयंती स्मृत्यर्थ जगभरात साजरा होणाऱ्या  परिचारीका दिनाचे औचीत्य साधुन दि. 12 मे रोजी हंसराज अहीर यांनी राजुरा येथील कोविड रूग्णालय  येथील कोविड सेंटर व व्हॅक्सीनेशन सेंटर वर  जावून परिचारीका भगिनींचा पुष्पगुच्छ देवून सन्मान केला. कोरोना सारख्या संकट काळात राष्ट्र व रूग्णसेवेचा वसा घेवून जिवावर उदार होत त्यांच्याव्दारे होत असलेली सेवा शब्द अन विचारांपलीकडची आहे अशा सद्भावना व्यक्त केल्या. त्यांना परिचारीका दिनाच्या तसेच निरामय आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments