चोपडा नगरपरिषद प्रशासनाकडून तापी परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांचा मानसिक छळ...!
जळगाव/चोपडा(राज्य रिपोर्टर) : चोपडा शहर पाणीपुरवठा करण्यासाठीच्या नव्या पाईपलाईन करण्याला कठोरा ग्रामस्थांचा विरोध. कठोरे गावाजवळील तापी नदी पात्रात पाणीसाठा शिल्लक नसताना तसेच तापी नदीवर कोणताही बांध/धरण नसताना चोपडा नगरपरिषद कडून पाणीपुरवठा योजनेसाठी नव्याने पाईपलाईन करण्यांत येत आहे. या कामामुळे शेतकऱ्यांचे उभ्या पिकाचा नुकसान होणार आहे तसेच सततच्या पाणी उपसामुळे परिसरातील भूजल पातळी दिवसेंदिवस कमी कमी होत आहे आणि त्यामुळे त्या क्षेत्रावर पिण्याचं पाण्याच्या प्रश्न निर्माण होणार आहे . व यामुळे सर्व शेतकऱ्यांच खूप नुकसान होत आहे.
या कामामुळे गावातील पाणीपुरवठा वितरण यावरही याचा गंभीर परिणाम होणार आहे. चोपडा नगरपरिषद कडून कठोरे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनकडून कोणतीही रीतसर परवानगी घेतलेली नसुन गावातून पाईपलाईन टाकण्याचा घाट बांधला जातो आहे. तसेच मलापुर धरण मधून भरपूर प्रमाणात पाणी साठा असताना परत का दुसरी पाइप लाइन टाकण्याचा विचार नगरपालिका च्या डोक्यात आलेला आहे एवढा मुबलक पाणीसाठा मलापुर धरण मधून होत असताना परत अजून कठोरा येथून एक पाईप लाईन असतांना अजून दुसरी नवीन पाईप लाईन टाकण्याचा विचार नगर परिषद का करत आहे? असंच होत असेल तर याला पूर्ण तापी परिसरातील शेतकरी व शेतकरी संघटनेचा संपूर्ण विरोध असेल कोणत्याही परिस्थितीत पाईप लाईन चे काम होणार नाही आणि असं जर करण्याचा प्रयत्न केला तर शेतकऱ्यांच्या अंगावरून जेसीबी फिरवा नंतर तुमची पाईप लाईन करा तुम्हाला जर काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावून घ्यायचा असेल तर तापी परिसरांतील सर्व शेतकरी व शेतकरी संघटना याला कायम विरोध करेल. ह्या कामासाठी चोपडा नगरपरिषद कडून कठोरा ग्रामस्थांना व तापी परिसर च्या शेतकऱ्यांना साम दाम दंड वापरू अश्या धमक्या देण्यात येत आहेत. चोपडा नगरपरिषद कडून गाववाल्यांचा मानसिक छळ होत असून यामुळे गावात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. शेतकऱ्यांचे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार आहे आधीच अवकाळी त्यात नगरपालिकेला ही अवदसा कशी सुचली हेच कळत नाही. जर चोपडा नगरपरिषदेने असाच छळ केला तर कठोरा व तापी परिसरातील ग्रामस्थ सामूहिक आत्महत्या करतील. व याला सर्वस्वी जबाबदार रातील याची नोंद घ्यावी. कठोरे ग्रामस्थ व तापी परिसर व व रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्त्वात शेतकरी संघटना यांच्या विरोध .




0 Comments