मुलाने बंडीच्या उभारीने वार करुन सख्ख्या बापाला केले ठार
◾मृतकाच्याच मुलाने पैश्याच्या वादावरून आपल्या सख्ख्या बापाच्या डोक्याला जबर मारहाण केल्याने मृत्यू
◾रात्री मृत शरीर रेल्वे रुळावर नेऊन टाकले
◾दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी
राजुरा/विरुर(राज्य रिपोर्टर) : राजुरा तालुक्यातील सिंधी गावानाजिक रेल्वे रुळावर गावातील तिरुपती तातोबा धानोरकर (वय 43) यांच्या मृतदेहाचे दोन तुकडे झालेल्या अवस्थेत प्रेत आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
ही घटना लक्षात येताच रेल्वे पोलिसांनी आकस्मिक अपघाताचा मर्ग विरूर पोलीस ठाण्यात दाखल केला होता या संदर्भात चंद्रपूर पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्याकडे हव प्रकरण सोपवले आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या सूचनेनुसार विरूर ठाणेदार किष्णा तिवारी व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने तात्काळ घटना पंचनामा करत तपासाची चक्रे फिरविली. त्यात प्रथमदर्शनी ही रेल्वेत कटून मृत झाल्याची घटना दिसत असली तरी मृत शरीराच्या निरीक्षणावरून घातापाताची दाट शक्यता समोर आल्याने पोलीसांनी काही संशयितांना पोलिसी धाक दाखवताच आरोपीकडून धक्कादायक खुलासा उघडकीस आला.
या घटनेत मृतकाच्याच मुलाने पैश्याच्या वादावरून आपल्या सख्ख्या बापाच्या डोक्याला जबर मारहाण केल्याने मृत्यू झाल्यानंतर रात्री मृत शरीर गावानाजिकच्या रेल्वे रुळावर नेऊन टाकले व त्यावरून रेल्वे गाडी गेल्याने मानेपासून धड कटून, दोन तुकडे झाल्याने आपला बाप मृत्यू झाल्याचा आव आरोपी मुलांकडून करण्यात आला होता.
परंतु पोलिसांच्या नजरेतून आरोपी मुलगा निखिल धानोरकर हाच मुख्य आरोपी वाटत होता.
राजुरा तालुक्यातील सिंधी येथील काल झालेल्या मुलाकडून पित्याच्या हत्या प्रकरणात विरुर पोलिसांनी पुन्हा एका सिंधी येथील युवकास अटक केली असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. त्या दोन्ही आरोपीना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिडाली असल्याची माहिती मिळाली आहे.
जमीन विक्री करून मिळालेल्या रक्कमसाठी घरात रात्री वाद होऊन सिंधी येथील निखिल धानोरकर याने आपल्याच जन्मदात्या वडील तिरुपती धानोरकर यांची (बैलबंडीची उभारी) काठीने रागाच्या भरात डोक्यावर जबर वार केले यात तिरुपती याचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे भयभीत होऊन निखिलने मित्र भाऊराव टेकाम याला पाचारण करून झालेल्या घटनेची माहिती दिली व प्रकरण सावरसावर करण्यासठी त्याची मदत मागितली तेव्हा निखिल जवळ असलेली हिरो स्पेलण्डर मोटार सायकल क्र. MH-34 S-1362 या वाहनावर मृत्युदेह घेऊन विरुर रेल्वे स्टेशन जवळील रेल्वे रुळावर त्याच रात्री आणून टाकले व आत्महत्या केल्याचा देखावा केला. मात्र विरुर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा विभागाने परिस्थिती चे सूक्ष्म परीक्षण करून अगदी दोन तासातच सदर प्रकरणाचा छडा लावला.
सदर प्रकरणी दोघांनाही अटक करून 302, 201, 34 भादवी गुन्ह्या अंतर्गत गुन्हा नोंदविला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या सूचनेनुसार विरूर ठाणेदार किष्णा तिवारी यांच्या मार्गदर्शनात सदानंद वडतकर पीएसआय विरुर, दिवाकर पवार हवालदार, नरगेवर हवालदार, शिपाई काळे, शिपाई मिलमीले, मुंडे यांनी सदर कारवाही केली.
0 Comments