बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात लहान-सहान बिमारीवर उपचारासाठी येणाऱ्यांना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करू नये : आम आदमी पार्टी बल्लारपूर ची मागणी

 

बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात लहान-सहान बिमारीवर उपचारासाठी येणाऱ्यांना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करू नये : आम आदमी पार्टी बल्लारपूर ची मागणी

बल्लारपूर(राज्य रिपोर्टर) : बल्लारपूर शहर हे तालुका मुख्यालय असून चंद्रपूर जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून ओळखले जाते.

  सद्यस्थितीत संपूर्ण महाराष्ट्र हे कोरोनाच्या सावटाखाली असून हळूहळू सावरण्याची स्थितीत आहे अशा परिस्थितीत बल्लारपूर तालुक्याच्या ग्रामीण भागातून लहान-सहान बिमारीवर उपचार करण्यासाठी नागरिक ग्रामीण रुग्णालयात दाखल होतात मात्र बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी येथिल रुग्नावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करतात देशासह महाराष्ट्र हे कोरोना या विषाणूजन्य आजाराने त्रस्त असतांना शिवाय चंद्रपूर हे जिल्हामुख्यालय असल्याने जिल्ह्यातील इतर तालुक्यातूनही नागरिक उपचारासाठी दाखल होतात. यामुळे जिल्ह्यातील सर्व रुग्णालय कोविड मूळे आधीच भरलेली असताना रुग्णाला बेड मिळणे कठीण होत आहे. तसेच अनेक रुग्णाला वेळेवर ऑक्सिजन व बेड मिळत नसल्याने उपचाराआभावी जीव जात आहे आणि अशा परिस्थितीत बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आपल्या जबाबदारी चे भान न ठेवता साधारण असलेल्या लहान-सहान बिमारीवर उपचार करून रुग्णाला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करतात ज्यामुळे रुग्ण व त्यांचे कुटुंबीय यांना अडचणींचा सामना करावा लागतो अशा स्थितीत जिथे प्रशासन कोविड सेंटर उघडण्याचा प्रयत्न करीत असताना बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयातील अनेक बेड खाली असलेले दिसून येतात या संबंधात बल्लारपूर आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने जिल्हा शल्यचिकित्सक राठोड साहेब यांना भेटून बल्लारपूर शहरातील आरोग्य विषयक चर्चा केली व जिल्हा शल्यचिकित्सकानी या संबंधाने बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांचेशी चर्चा केली यावेळी निवेदन देताना रविकुमार पुप्पलवार, सययद अफजल अली, आसिफ हुसेन, शमशेर सिंग चव्हाण, अजहर अली ई ची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments