बल्लारपूर पोलिसांनी धडक कारवाई
दुचाकी चोरट्याला अटक
🔹75,000/- रु किमतीच्या दुचाकी जप्त
बल्लारपूर(राज्य रिपोर्टर) : बल्लारपूर पोलीस ठाणे अंतर्गत अप क्र 505/2020 भा.द.वी कलम 379 या गुन्हाचा तपास करत असताना पोशी अजय हेडाऊ व गणेश पुरडकर यांना गुप्त माहितीनुसार सपोनि विकास गायकवाड व टीम ने 1 आरोपी व 2 विधिसंघर्ष ग्रस्त बालकांना ताब्यात घेतले यानुसार संतोष राठोड वय-18 वर्ष रा काटा गेट जवळ बल्लारपूर जि. चंद्रपूर यांना 16 मे 2021 रोजी अटक करून एकूण 3 गुन्हे उघडकीस आणले त्यात MH-34 AC-7157, काळ्या रंगाची हिरो हिरो होंडा सीडी डीलक्स अंदाजे किंमत 15,000/- रु, तर MH-34 AL-6571 काळ्या रंगाचा पॅशन प्रो अंदाजे किंमत 20,000/- रु तर MH-34 AX-3648 काळ्या रंगाची होंडा ड्रीम युगा मोटरसायकल अंदाजे किंमत 25,000/- तर MP-45 MB-4467 क्रमांक ची लाल काळ्या रंगाची हिरो होंडा सीडी डीलक्स अंदाजे किंमत 15,000/- असा एकूण 75,000/- रु किमतीच्या एकूण चार दुचाकी जप्त करण्यात आल्या. सदर कारवाई उमेश पाटील पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विकास गायकवाड, रमीझ मुलाणी, प्रमोद रासकर, चेतन टेम्भुरने, ठाकरे, गिरीश, सुधाकर वरघणे, राजेश, बाबा नैताम, शरद कुडे, राकेश,प्रवीण, अजय हेडाऊ, श्रीनिवास वाभीटकर, दिलीप आदे, गणेश पुरडकर, शेखर मथनकर, किशोर, संध्या आमटे, सीमा पोरते ई नी कारवाईत सहभाग घेतला.





0 Comments