नावात (डोंगा) बसलेल्या 3 मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू

 

नावात (डोंगा) बसलेल्या 3 मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू

चामोर्शी तालुक्यातील वाघोली येथील घटना तीनही मुलींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू 

चामोर्शी(राज्य रिपोर्टर) : चामोर्शी तालुक्यातील वाघोली येथील 14, 15, आणि 13 या वयाच्या तीन मुली वैनगंगा नदीच्या पात्रात नावावर (डोंगा) बसून दुसऱ्या काठावर आंबे तोडण्याकरिता जात असताना नाव (डोंगा) नदीत बुडाल्याने नावात (डोंगा) बसलेल्या तीनही मुलींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मृत झालेल्या मुलींची नावे 1) सोनी मूकरू शेंडे 2) सम्रुधी ढिवरु शेंडे 3) पल्लवी रमेश भोयर या तीन मुलीपैकी सोनी मूकरू शेंडे ही विश्वशांती विद्यालय भेंडाळा येथील विद्यार्थीनी असून ती यावर्षी आठव्या वर्गात होती.

 या मुली डोण्ग्यात बसून नदी च्या दुसऱ्या काठावर आंबे तोडण्याकरिता जात होत्या, जेव्हा डोंगा खोल गर्त्याजवळ आला तेव्हा डोण्ग्याचा तोल सुटला आणी या तीनही मुली डोण्ग्याच्या खाली पडल्या, या मुलींना पोहता येत नसल्याने यांचा बुडून करुण अंत झाला.


Post a Comment

0 Comments