पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

 

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

चंद्रपूर(राज्य रिपोर्टर) : राज्याचे आपत्ती व्यवस्थापनमदत व पुनर्वसनइतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार दि. 9 मे ते 10 मे 2021 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्‍यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

रविवारदि.9 मे 2021 रोजी सकाळी  9 वाजता कमलाई निवासरामदासपेठनागपूर येथून ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर कडे प्रयाण करतील. सकाळी 11.30 वाजता शासकीय विश्रामगृहब्रम्हपुरी  येथे आगमन व राखीव. सकाळी 11.45 वाजता शासकीय विश्रामगृहब्रम्हपुरी येथे अधिकाऱ्यांसमवेत कोविड विषयक आढावा बैठक घेतील. दुपारी 1.30 ते 2.30 वाजेपर्यंतचा वेळ राखीव राहील. साय. 4.15 वा. ब्रम्हपुरी येथून गडचिरोली कडे प्रयाण करतील.

सोमवारदि. 10 मे 2021 रोजी सकाळी 9 वाजता गडचिरोली येथून चंद्रपूरकडे प्रयाण करतील. सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व राखीव. दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात येथे अधिकाऱ्यांसमवेत कोविड विषयक आढावा घेतील. दुपारी 3 वाजता चंद्रपूर येथून नागपूर कडे प्रयाण करतील साय 5.30 वा. कमलाई निवासरामदासपेठनागपूर येथे आगमन व मुक्काम राहिल.

Post a Comment

0 Comments