भरड धान्य खरेदी केंद्र लवकरात लवकर चालू करा.

 

भरड धान्य खरेदी केंद्र लवकरात लवकर चालू करा. 

रघुनाथ दादा यांच्या नेतृत्वत शेतकरी संघटनेची मागणी

जळगाव/चोपडा (राज्य रिपोर्टर) : भरडधान्य नोंदणी पूर्ण होऊन दीड महिना उलटला अजूनही खरेदीची काहीच हालचाल दिसत नाही जिल्हा मार्केटिंग फेडरेशन कडून खरेदी होणाऱ्या भर घालण्यासाठी जिल्हाभरातून एकूण १७ हजार ३२९ शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी पूर्ण झालेली आहे. हंगामा चे दिवस डोक्यावर येत असताना शेतकऱ्यांना शेतीची मशागत करून बियाणे रासायनिक खताचे नियोजन करायचे आहे बियाण्यासाठी हातात पैसा नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये खाजगी व्यापारी मनमानीने शेतकऱ्यांकडून कमी अधिक भावाने शेतमाल खरेदी करून घेत आहेत शासनाने हमीभाव काढूनही शेतकरी वंचित आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकाही शेतकऱ्याला हमीभाव मिळत नाही ही शोकांतिकाच आहे वरून शासन म्हणतो की नोंदणी केलेले भरडधान्य आम्ही खरेदी करू याची शाश्वती नाही शासनाला जर खरेदी करायची नव्हती तर मग नोंदणी कशासाठी करायला लावली शेतकऱ्यांना 

शेतकऱ्यांची ही खूप मोठी थट्टा शासन करत आहे एका उताऱ्याची नोंदणीसाठी शेतकऱ्याला शंभर रुपये खर्च येतो शासनाने किती पैशांच्या चुराडा शेतकऱ्यांना करण्यास भाग पाडले आहे त्यांचे नुकसान भरपाई करून कोण देईल असा सवाल शेतकरी संघटनेचे मा. जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांनी केला आहे.

शासनाने भरड धान्य खरेदी केंद्र महिनाभर आधीच सुरू करणे गरजेचे होते मात्र शासन दरवर्षी शेतकऱ्यांना वेठीस धरून दोन महिन्या उशिराने चालू करतात करुणा काळात जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांनी पहाटे चार वाजेपासून लायनीत उभे राहून नोंदणी केलेली आहे तरी शासनाने याची दखल घेऊन खरेदी लवकरात लवकर चालू करावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे मा. जिल्हाध्यक्ष संदीप पाटील , संजय महाजन जिल्हाध्यक्ष, किरण गुर्जर उपजिल्हाध्यक्ष सचिन शिंपी चोपडा अखिलेश पाटील भडगाव खुशाल सोनवणे एरंडोल अखिलेश पाटील भडगाव मंगेश राजपूत अमळनेर जीवन चौधरी यावल नामदेव महाजन पाचोरा जीवन चौधरी यावल यांनी केली आहे.

सविस्तर प्रतिक्रिया... भरड धान्य अंतर्गत गहू, ज्वारी व मका या धान्यांची नोंदणी झालेली आहे जिल्ह्यात १७ खरेदी केंद्र मंजूर करण्यात आली असताना शासनाने अजूनही धान्य खरेदीचे आदेश काढलेले नाहीत जिल्ह्यातील एकही लोकप्रतिनिधी या विषयावर बोलायला तयार नाहीत मात्र धान्य खरेदी करण्याचे आदेश मिळाले की उद्घाटन साठी सर्वात अगोदर आमदार खासदार हजर होत असतात पालकमंत्र्यांनी शासनाकडून भरड धान्य खरेदी करण्यासंबंधी आदेश आणावेत शेतकरी संघटना त्यांचे जाहीर सत्कार करण्यात येईल.


संदीप आधार पाटील

शेतकरी संघटना

 माजी जिल्हाध्यक्ष, जळगाव



Post a Comment

0 Comments