ग्रामपंचायत टेबूंरवाहिचा भोंगळ कारभार, अर्ज करूनही अर्जाला केराची टोपली
✳️ग्रामपंचायत हि जागा मोकडि करून देण्यात असक्षम ठरली
राजुरा (राज्य रिपोर्टर) : ग्रामपंचायत टेबूंरवाहि या हद्दीतील मौजा तुलाना या गावातील महिपाल सत्यपाल मडावी यांची ८९५ से. फूट हि जागा असून, त्या जागेलगत साऊजि घुलाराम मडावी यांची जागा आहे, त्या जागेवर साऊजि मडावी यांचा मुलगा श्रीराम साऊजि मडावी यांच्या घराचे बांधकाम सुरु असून त्यानी आपली जागा मोजमाप न करता व नियमानुसार दिड फुट जागा न सोडता बांधकाम सुरू केले आहे , परंतु महिपाल मडावी यांच्या म्हणण्यानुसार श्रीराम मडावी यांचे बांधकाम महिपाल मडावी यांच्या जागेत पाच फूट अवैध बांधकाम आलेले आहे.
तसे रीतसर अर्ज ग्रामपंचायतला केले पंरतु ग्रामपंचायत हि जागा मोकडि करून देण्यात असक्षम ठरली, नंतर तशी दाद गटविकास अधिकारी यांच्या कडे सुधा केली पंरतु पंचायत समिती कडुन सुधा उडवाउडवीचे उत्तर मिळत राहिले त्यामुळे महिपाल मडावी यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.
त्यामुळे प्रशासन हतबल झाले आहेत, म्हणून आता कुणाकडे दाद मागावी हा प्रश्न महिपाल मडावी यांना पडलेला आहे, तरी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित करून त्वरीत ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनाने जागेचा निर्णय लावून जागा मोकडि करून द्यावी, व तोपर्यंत श्रीराम मडावी यांच्या घराचे बांधकाम थांबवण्यात यावे, अन्यथा मि महिपाल मडावी माझ्या जिवाचे बरेवाईट करेन व माझ्या परीवाराकडुन कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याला जबाबदार ग्रामपंचायत टेंबुरवाहि येथील, सरपंच, सचिव, ऊपसंरपच, पंचायत समिती गटविकास अधिकारी असतिल.





0 Comments