18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत असलेल्या लसीकरण केंद्राला आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली भेट, उपाययोजनांची पाहणी
चंद्रपूर(राज्य रिपोर्टर) : 18 ते 44 वर्षा पर्यंतच्या नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली असून यासाठी शहरात दोन लसीकरण केंद्र तयार करण्यात आले आहे. दरम्याण आज या दोनही लसीकरण केंद्रांना आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट देत येथील उपाययोजनांची पाहणी केली. यावेळी अनेक महत्वाच्या सुचनाही त्यांनी प्रशासनाला केल्यात तसेच यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी येथे आलेल्या
युवकांशी संवाद साधत लसीकरणासाठी युवाकांनी पूढे येण्याचे आवाहण केले.
18 ते 44 वयोगटातील नागरीकांना कोरोना आजारावरील कोविशिल्ड ही लस २ मे पासून जिल्हातील सात केंद्रावर प्रायोगिक तत्वावर देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आलेले आहे. तर शहरातील रामचंद्र हिंदी प्राथमिक शाळा व पंजाबी सेवा समिती, तुकुम या दोन ठिकाणी हे लसीकरण केेंद्र सुरु करण्यात आले आहे. आज या दोन्ही लसीकरण केंद्रांना आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद देखील साधला. येथे लसीकरणासाठी येणा-या नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावा, येथे पिण्याच्या थंड पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, लसीकरणासाठी रांगेत असलेल्या नागरिकांना उन्हेत उभे राहावे लागू नये यासाठी व्यवस्था करण्यात यावी, त्यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात यावी, लसीकरणानंतर योग्य मागर्दशन करण्यात यावे, यासह अणेक सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी केल्या आहे. लसीकरणाच्या माध्यमातून कोविड -19 ला हरविणे शक्य आहे. त्यामूळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावे, नोंदनी प्रक्रियेत अडचण येत असल्यास लगेच प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहण यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे.





0 Comments