खासदार बाळूभाऊ धानोरकर यांची प्रत्यक्ष कोविड केअर सेंटर मध्ये जाऊन पाहणी

  

खासदार बाळूभाऊ धानोरकर यांची प्रत्यक्ष कोविड केअर सेंटर मध्ये जाऊन पाहणी 

बल्लारपूर(राज्य रिपोर्टर) : आज सायंकाळी सहा वाजता चंद्रपूर वणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय बाळूभाऊ धानोरकर यांनी बल्लारपूर तालुक्यातील विसापूर स्थित कोविड केअर सेंटरची प्रत्यक्ष पाहणी केली.

   त्यावेळी त्यांनी कोविड पेशंट सोबत प्रत्यक्ष संवाद साधला. त्यांची आस्थेने विचारपूस केली. जेवन, चहा-नाश्ता, राहण्याची व्यवस्था,डॉक्टरांची व्हीजिट यासंबंधी विचारपूस केली. एकंदरीत सर्व तालुका प्रशासनाने केलेली व्यवस्था बघता खासदारांनी समाधान व्यक्त केले.तिथेच त्यांनी तालुकास्तरीय अधिकार्‍यांशी चर्चा केली.

    बल्लारपूर येथे 60 बेडचे केअर सेंटर कार्यरत आहे.नवीन 120 बेडच्या केअर सेंटर निर्मितीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. यावेळी बल्लारपूर चे उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे,मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मेश्राम,तहसीलदार संजय राईनचवार,प्रभारी ठाणेदार मुलानी तसेच काँग्रेस पक्षाचे घनश्याम मुलचंदानी,अब्दुल करीम इत्यादी लोक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments