बल्लारपूर पोलिसांनी कारवाई दारुसाठ्यासह 5,69,000/- मुद्दे माल जप्त

 

बल्लारपूर पोलिसांनी कारवाई दारुसाठ्यासह 5,69,000/- मुद्दे माल जप्त


बल्लारपूर(राज्य रिपोर्टर) :  सोमवार रोजी बल्लारपूर पोलीस ठाणे अंतर्गत सपोनि विकास गायकवाड यांना मुखबिर कडून माहिती मिळाली की, आकाश डांगोरे हा आपल्या बोलेरो गाडीमध्ये दारू आणून व्हिलेवाट लावत आहे.

 सदर माहिती वरून विकास गायकवाड व त्यांच्या टीम ने धाड टाकली असता देशी दारूच्या रॉकेट संत्राच्या 460 बॉटल अंदाजे किंमत 69,000/- रु तर MH-34 AM-8981 महिंद्रा बोलेरो क्रमांकाचे चार चाकी अंदाजे किंमत 5,00,000 रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 याप्रकरणी आकाश आनंद डांगोरे रा.पंडित दीनदयाल वॉर्ड बल्लारपूर यांना अटक करण्यात आली व आरोपी विरुध्द पो.स्टे अप क्र. 568/2021 मदका कलम 65(ई) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला सदर कारवाई उमेश पाटील पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विकास गायकवाड, रमीझ  मुलाणी, प्रमोद रासकर, चेतन टेम्भुरने, ठाकरे, गिरीश, सुधाकर वरघणे, राजेश, बाबा नैताम, शरद कुडे, राकेश,प्रवीण, अजय हेडाऊ, श्रीनिवास वाभीटकर, दिलीप आदे, गणेश पुरडकर, शेखर मथनकर, किशोर, संध्या आमटे, सीमा पोरते ई नी कारवाईत सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments