शहरात पाणी टंचाई निर्माण होवू नये यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपाला दिला 1 करोड 49 लाखांचा निधी
चंद्रपूर(राज्य रिपोर्टर) : अमृत कलश योजनेचे काम अतिशय संथ गतीने सुरु आहे. परिणामी शहरात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता आमदार किशोर जोरगेवार यांनी उपाययोजनांसाठी 1 करोड 49 लक्ष रुपयांचा निधी चंद्रपूर शहर महानगर पालिकेला दिला आहे. या निधीतून पाण्याच्या टाक्या, कुपनलीका तसेच बोरवेल तयार करण्यात येणार आहे.
चंद्रपूर शहरातील नागरिकांना दर उन्हाळ्यात भिषण पाणी टंचाईचा सामाना करावा लागतो. त्यामूळे नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळावे या करिता आमदार किशोर जोरगेवार यांचे प्रयत्न सुरु आहे. आमदार किशोर जोरगेवार यांना मिळालेला 25 लाखांचा पहिला निधी त्यांनी पाण्यासाठी खर्च करत या निधीतून शहरातील विविध भागात 13 बोरवेलचे काम केले होते. शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न सुटावा याकरीता त्यांच्या वतीने अनेकदा मनपाच्या अधिका-यांशी बैठका घेण्यात आल्या आहे. या बैठकांमध्ये पाणी पूरवठा संदर्भात अनेक महत्वाच्या सुचनाही आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा प्रशासनाला केल्या आहेत. मात्र अनेक भागात पाणी पूरवठा करण्या-या प्रणालित काही त्रुट्या असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या लक्षात आले होते. त्यामूळे या त्रुट्या दुर करत उपाययोजना करण्यासाठी त्यांनी स्थानिक आमदार विकास निधी व खनिज विकास निधीतून मनपा प्रशासनाला 1 करोड 49 लक्ष 600 रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीचा योग्य उपयोग करुन गरज असलेल्या ठिकाणी छोट्या पाण्याच्या टाक्या, कुपनलीका, बोरबेल यासह इतर उपाययोजना करण्यात याव्यात, शहरातील शेवटच्या भागातील नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी देण्याच्या दिशेने उपाययोजना करण्यात याव्या आशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा प्रशासनाला केल्या आहे. या निधीतून शहरातील विविध भागात 21 पाण्याच्या छोट्या टाक्या, 21 कुपनीला तर 51 हातपंप तयार केल्या जाणार आहे. यासाठीची प्रक्रियाही पूर्ण झाली असून लवकरच हे कामे सुरु होणार आहेत. हे काम पूर्ण होताच पाणी टंचाई निर्माण होणा-या भागात छोट्या पाण्याच्या टाकींच्या माध्यमातून पाणी पूरवठा केला जाणार आहे. या पाण्याच्या टाक्या कुपनलीकांच्या माध्यमातून नियमीत भरल्या जाणार आहे. त्यामूळे इरई धरणातील पाणी साठ्याचा या टाक्यांवर कोणताही परिणाम जाणवणार नसून या भागांमधील पाणी पूरवठा नियमीत सुरु राहणार आहे.




0 Comments