बल्लारपुर पोलीस स्टेशन चे डी.बी पथकाचे धडक कारवाई 38 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

 

बल्लारपुर पोलीस स्टेशन चे डी.बी पथकाचे धडक कारवाई 38 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

🔸दोन आरोपी अटक दोन  फरार

बल्लारपूर(राज्य रिपोर्टर) : अवघ्या महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन सुरू असताना तसेच जिल्हाबंदी ची अमलबजावणी होत असताना चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दारूची तस्करी होतांना दिसून येते विशेष बल्लारपूर शहरात दारू तस्कर विविध क्लुप्त्या लढवून दारूची तस्करी करतात सद्यस्थितीत लॉकडाउन ची स्थिती असल्यामुळे पोलीस बंदोबस्तात असल्याचे दिसतात या बाबीचा फायदा दारू तस्कर घेतांना दिसतात मात्र 5 मे ला सकाळच्या सुमारास विश्वसनीय सूत्राच्या माहितीनुसार बल्लारपूर पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक रमीझ मुलांनी व सहा पोलीस निरीक्षक विकास गायकवाड यांना अवैध दारूची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच बल्लारपूर शहरातील नवीन बसस्थानक समोर 12 चाकी टाटा कम्पनीच्या ट्रक मध्ये दारूची तस्करी होत असल्याचे मिळाली माहिती. 

बल्लारपूर पोलीस ठाणे अंतर्गत मुखबिराच्या  खबरी वरून आपल्या टीम सोबत सर्च करीत टाटा कंपनी ची 12 चक्का ट्रक शोध घेतला असता ट्रक नवीन बस स्थानक समोरील रस्त्याने जातांना दिसले त्या ट्रकला अडवून विचारपूस करीत झडती केली असता त्यात खरड्याचा चे बॉक्स मध्ये देशी दारू आढळून आली. ट्रक ला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून तपास केली त्यात 124 खरड्याचा बॉक्स मध्ये देशी दारू रॉकेट संत्रा अंदाजे की,18 लाख 60 हजार रु, मिळून आला. टाटा कंपनी ची ट्रक अंदाजे 20 लाख असा मिळून 38 लाख 60,000 रु, चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि दोन आरोपी 1) प्रदीप दारला 2) करण निषाद दोन्ही रा, भगतसिंग वॉर्ड, बल्लारपुर, ला ताब्यात आणि दोन आरोपी 1) प्रशांत भानुदास दारला 2) शेख अशपाक शेख अजीम फरार झाले. या चारही आरोपींना अप क्र. 512/2021 मादाका कलम 65(अ) 83 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई गुन्हे शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक रझिम मुलाणी व सहा.पोलीस निरीक्षक विकास गायकवाड, पोहवा सुनील कामतकर, पोना मनोज पिदूरकर, पोशि श्रीनिवास वाबिटकर, पोशि शेखर माथनकरव दिलीप आदे यांनी केली. 

मात्र लॉकडाउन दरम्यान दारूची तस्करी होतेच कशी ? हा चर्चा नागरिकात होत आहे.

Post a Comment

0 Comments