बल्लारपूरात पेपर मिल बंबू गेट फुटी दिवाल परिसरात 12 चाकी ट्रक उलटला
🔸 जीवित हानी टळली
बल्लारपूर(राज्य रिपोर्टर) : बल्लारपूर शहरातील फुटी दिवाल परिसरात आज सायंकाळी 4:00 वाजताच्या सुमारास निर्भय ट्रान्सपोर्ट यांचा 12 चाकी ट्रक क्र. MH 34 AB 7535 तेलंगाना च्या करीमनगर येथून भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे कृषीच्या उपयोगासाठी येणारे धानाची बियाणे घेऊन जात असताना फुटी दिवालच्या वळणावर उलटला या अपघातामुळे दोन्ही बाजूनी वाहतूक विस्कळीत झाले मात्र बल्लारपूर येथील वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी निलेश मांडवे व महेंद्र कातोरे यांनी वाहतूक सुरळीत होण्यास मदत केली मात्र या अपघातामुळे ट्रकचे मोठे आर्थिक नुकसान झाले मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही.




0 Comments