चोपडा येथील युवक व वरिष्ठांचा प्लाझा दान करण्यासाठी पुढाकार ...!

 


चोपडा येथील युवक व वरिष्ठांचा प्लाझा दान करण्यासाठी पुढाकार ...! 

धन की गिनती नहीं होगी; बातो की गिनती नहीं होगी; आपके एक्शन की गिनती जरूर होगी! 

 दादा जे पी वासवानी

चोपडा(राज्य रिपोर्टर) :  प्लाझ्मा दानात देखील चोपडे कर सगळ्यात पुढे.... श्री. सुनील महाजन ,श्री. सचिन  महाजन व श्री. दिव्याक सावंत ह्या  चोपडा येथील दात्याणी काल आपला प्लाझ्मा दान करून सहा रुग्णांचे प्राण वाचवण्यात मोलाची मदत केली.अड. कुलदीप पाटील यांचे प्लाझ्मा तांत्रिक अडचणीमुळे काल घेता आले नाही.ते नंतर घेणार आहेत.

  प्लाझ्मा काढण्याची प्रक्रिया रक्तदान सारखीच असते पण प्लाझ्मा वेगळे करून रक्तातील इतर घटक परत शरीरात सोडले जातात. दिवसाकाठी फक्त पाच ते सहा प्लाझ्मा दात्यांचा प्लाझ्मा काढला जातो.

   जेव्हा काल हे दाते प्लाझ्मा देण्यास इंडियन रेडक्रोस सोसायटीचे ब्लड बँकेत गेलेत तेव्हा तेथे असंख्य रुग्णांचे नातेवाईक यां दात्याना विनंती करायचे आम्हाला द्या या वरून त्याची किती गरज आहे हे सांगणे न लगे.

   काल आमचे आवाहनास प्रतिसाद देवून चार प्लाझ्मा दात्याणी आपले रक्त तपासणी साठी पाठवले आहे ते (१)डॉ. केयुर दीक्षित(२) श्री. प्रफुल्ल स्वामी(३)श्री. अंबर पाटील(४)श्री. सतीश गळे. आज अजून सात दात्यांचे रक्त तपासणी साठी जात आहे.(१)श्री. श्याम भाऊ सोमाणी(२),श्री. राम भाऊ सोमाणी (३)श्री. जीवन पाटील,(४)सौरभ पवार (५)निरज नरवाडे (६)देवेंद्र बाविस्कर (७)विजय महाजन. अकरा प्लाझ्मा दाते तयार आहेत,यातील पात्र दात्यांस बोलावले जाईल तेव्हा त्यांचा प्लाझ्मा दान केलाजाईल.

  चोपडा तालुक्यातील माणसे ही मानवतेचे पुजारी आहेत,  कोल्हापूरची नैसर्गिक आपत्ती असो की राष्ट्रीय  आपत्ती आपले योगदान देण्यासाठी सदैव पुढे असते.

      आम्ही  इतर नागरिकांना देखील आपणास विनंती करतो की आपल्या नातेवाईक सिरियस झाले की आपण लोकांच्या गयावया करतो त्यासाठी तुम्ही आपल्या परिचयातील हजारो कोरोणा positive रुग्ण आहेत त्यांना देखील तयार करा.आपण आज कुणाला जरी प्लाझ्मा दिला तर कुणाची तरी सोय होईल व चांगले करा चांगले होईल या न्यायाने परमेश्वर तुमच्यासाठी देखील सोय करेल.गेल्या एक महिन्यापूर्वी जे कोरोणा positive आलेत असे  ६०वर्षाखालील दाते आपला प्लाझ्मा देवून  कोरोणा रुग्णांचा जीव वाचवू शकतात.

    येत्या एक तारखेपासून १८वर्ष वया चे वरील युवकांचे देखील लसीकरण सुरू होईल व रक्ताची गरज पडल्यावर देता येणार नाही त्यासाठी इच्छुक रक्तदाते यांनी देखील रक्तदान करावे .त्यांच्यासाठी देखील शिबिर लावले जाईल.

साऱ्या दात्यांचे प्रांत शिंदे,तहसीलदार अनिल गावित,डॉ. मनोज पाटील,डॉ. प्रदीप लासुरकर,डॉ. गुरुप्रसाद वाघ,डॉ. चंद्रकांत बारेला,नायब तहसीलदार साळुंखे, पऊळ, व एस बी पाटील, दीपक पाटील,रमाकांत सोनवणे, मयुर शिंदे, यांनी अभिनंदन केले.



Post a Comment

0 Comments