पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

 


पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

चंद्रपूर(राज्य रिपोर्टर) : राज्याचे आपत्ती व्यवस्थापनमदत व पुनर्वसनइतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार दि. 27 एप्रिल ते 30 एप्रिल 2021 पर्यंत चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्‍यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

मंगळवार दि. 27 एप्रिल 2021 रोजी सकाळी 9:00 वाजता कमलाई निवासरामदास पेठनागपूर येथून चंद्रपूर कडे प्रयाण करतील.सकाळी 11:30 वाजता शासकीय विश्रामगृहचंद्रपूर येथे आगमन व राखीव राहतील. दुपारी 12:15 वाजता  वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यासमवेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देतील. दुपारी 12:30 वाजता वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यासमवेत कोविड-19 संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक. दुपारी 1:30 वाजता वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषद घेतील. दुपारी 2:00 वाजता हिराई विश्रामगृहऊर्जानगर येथे आगमन व मुक्काम राहतील.

बुधवार दि. 28 एप्रिल 2021 रोजी सकाळी 9:00 वाजता चंद्रपूर येथून सावलीकडे प्रयाण करतील.सकाळी 10:00 वाजता सावली येथील कोविड सेंटरला भेट.सकाळी 10:15 वाजता ग्रामीण रुग्णालय सावलीला भेट. सकाळी 10:30 वाजता तहसील कार्यालय सावली येथे कोविड आढावा बैठक. दुपारी 2:15 वाजता सावली येथून चक विरखल ता. सावलीकडे प्रयाण करतील. दुपारी 2:30 वाजता चक विरखल ता. सावली येथे आगमन व श्री.तांगडे यांच्याकडे सांत्वनपर भेट देणार आहेत. दुपारी 3:00 वाजता चक विरखल ता. सावली येथून गडचिरोलीकडे प्रयाण करतील. दुपारी 3:30 वाजता गडचिरोली सामान्य रुग्णालय व कोविड सेंटरला भेट. सायंकाळी 4:15 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे कोविड आढावा बैठक घेतील. रात्री 6:00 वाजता शासकीय विश्रामगृहरानफूल निवासपोटेगाव रोड,गडचिरोली येथे आगमन व मुक्काम करतील.

गुरुवारदि.29 एप्रिल 2021 रोजी सकाळी 9:00 वाजता गडचिरोली येथून ब्रह्मपुरी जि. चंद्रपूरकडे प्रयाण करतील. सकाळी 10:15 वाजता शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी येथे आगमन व राखीव. सकाळी 10:30 वाजता ब्रह्मपुरी येथील कोविड सेंटरला भेट देतील. सकाळी 10:45 वाजता शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी येथे कोविड आढावा बैठक घेतील. दुपारी 1:30 ते 2:00 वाजेपर्यंतचा वेळ राखीव राहील. दुपारी 2:00 वाजता ब्रह्मपुरी येथून नागभीडकडे प्रयाण करतील. दुपारी 2:20 वाजता नागभीड येथे आगमन व कोविड सेंटरला भेट देतील. दुपारी 2:40 वाजता तहसील कार्यालय नागभीड येथे कोविड आढावा बैठक घेतील. दुपारी 3:30 वाजता नागभिड येथून ब्रह्मपुरीकडे प्रयाण करतील. सायंकाळी 4:00 वाजता शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी येथे आगमन व मुक्काम.

शुक्रवार दि. 30 एप्रिल 2021 रोजी सकाळी 9:00 वाजता ब्रह्मपुरी येथून राजुरा जि. चंद्रपूरकडे प्रयाण करतील. सकाळी 11:00 वाजता शासकीय विश्रामगृहराजुरा येथे आगमन व राखीव राहतील. सकाळी 11:15 वाजता राजुरा येथील कोविड सेंटरला भेट देतील. सकाळी 11:30 वाजता उपविभागीय कार्यालय ( महसूल) राजुरा येथे कोविड आढावा बैठक घेतील. दुपारी 1:00  ते 2:00 वाजेपर्यंतचा वेळ राखीव राहील. दुपारी 2:00 वाजता राजुरा येथून बल्लारपूरकडे प्रयाण करतील. दुपारी 2:30 वाजता बल्लारपूर येथे आगमन व कोविड सेंटरला भेट देतील. दुपारी 3:00 वाजता उपविभागीय कार्यालय (महसूल) बल्लारपूर येथे अधिकाऱ्यांसमवेत कोविड आढावा बैठक घेतील.  सायंकाळी 4:00 वाजता बल्लारपूर येथून चंद्रपूरकडे प्रयाण करतील. सायंकाळी 4:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयचंद्रपूर येथे आगमनसायंकाळी 7:00 वाजता हिराई विश्रामगृहऊर्जानगर येथे आगमन व मुक्काम राहतील.

Post a Comment

0 Comments