बल्लारपूर येथील प्रा.मिलिंद जांभुळकर यांचे हैद्राबाद येथे निधन

 


बल्लारपूर येथील प्रा.मिलिंद जांभुळकर यांचे हैद्राबाद येथे निधन

बल्लारपूर (राज्य रिपोर्टर) : बल्लारपूर शहरातींल आंबेडकरी चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते व चंद्रपूर येथील जनता महाविद्यालय येथे कार्यरत असलेले प्रा.मिलींद जांभुळकर वय - 50 वर्ष यांचे हैद्राबाद येथे आज सकाळी 6:00 वा उपचारादरम्यान निधन झाले त्यांच्या निधनाने वृत्त येताच बल्लारपूर शहरात शोककळा पसरली विविध माध्यमातून प्रा.मिलींद जांभुळकर सरांना आदरांजली व्यक्त करण्यात येत आहे बल्लारपूर शहरात रिपब्लिकन साहित्य परिषद चे आयोजन करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता शिवाय बल्लारपूर शहरात आंबेडकरी विचार रुजविण्यात त्यांचा महत्वाचा सहभाग होता जनता महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू होण्यापूर्वी प्रा.मिलींद जांभुळकर सरांनी बल्लारपूर येथील महिला महाविद्यालय येथे ज्ञान दानाचे कार्य केले होते याविषयीच्या अधिक माहितीनुसार प्रा.मिलींद जांभुळकर सरांवर चंद्रपूर येथे उपचार करण्यात आले होते मात्र प्रकृती उपचाराला साथ देत नसल्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना 8 ते 10 दिवसांपूर्वी हैद्राबाद येथे दाखल करण्यात आले होते मात्र आज 24 एप्रिल 2021 ला सकाळी 6:00 वा च्या दरम्यान आज त्यांच्या निधनाने वृत्त बल्लारपूर शहरात कळताच बल्लारपूर शहरात शोककळा पसरली असून विविध माध्यमातून सरांना आदरांजली अर्पण करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments