बल्लारपूरात भिमा कोरेगावच्या लढ्यातील शूरवीरांना मानवंदना व महामानवाला अभिवादन
बल्लारपूर (राज्य रिपोर्टर) : 1 जानेवारी 1818 हा दिवस भारतीय इतिहासामध्ये एक वेगळे महत्व घेऊन जन्मास आला होता सुमारे 203 वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील भीमा नदीच्या काठावर बसलेल्या कोरेगावात एका महाविधवनसक युध्दाचे साक्षीदार व्हावे लागले होते.
पेशव्यांच्या 28,000 सैनिकांना त्याकाळी 500 शूर वीरांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन ते युध्द जिंकले या पराक्रमाला पाहून इंग्रजांनी त्याठिकाणी एक विजयीस्तभ उभारला व त्यावर त्या शूर सैनिकांची नावे कोरली गेली महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या जीवन काळात दरवर्षी या शूर सैनिकांना मानवंदना द्यायला जायचे आज या रण संग्रामाला 203 वर्ष पूर्ण होत आहे.
आज भारतासह संपूर्ण जग कोरोना या विषाणूजन्य आजाराला तोंड देत असतांना सुध्दा भारतात आज अनेक ठिकाणी भिमा कोरेगाव लढ्यातील शूरवीरांना अभिवादन करण्यात येत आहे. चंद्रपूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ भिमा कोरेगाव विजयी स्तभं ची प्रतिकृती उभारून मांवनदना देण्यात येत आहे तर बल्लारपूर शहरातील विद्यानगर वॉर्ड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ समता सैनिक दला च्या वतीने आज सकाळीच मांवनदना देण्यात आली आयु प्रभूदास देवगडे, बुध्दशिल बहादे, भिमचंद पाटील यांच्या सह समता सैनिक दल च्या सैनिकांनी मांवनदना दिली या शिवाय बल्लारपूर शहरातील नगर परिषद परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात अनेक आंबेडकरी अनुयायांनी भीमा कोरेगावच्या विजयी स्तभं ला मांवनदना देऊन महामानवाला अभिवादन केले याशिवाय 1 जानेवारी 2018 ला भीमा कोरेगाव परिसरात अनैतिक कृत्य करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यासंदर्भात फलकाद्वारे निदर्शन करण्यात आली यावेळी विचार व्यक्त करतांना मान्यवरांनी म्हंटले की " भीमा कोरेगाव म्हणजे एका संघर्षाची लढाई नसून ती अस्तित्वाची व आत्मसन्मानाची लढाई होती विषमतेविरुध्द चा लढा होता, हजारो वर्षांपासून दलित शोषित पीडित वंचीत समाजाचा लढा होता." यावेळी अभिवादन करतांना सामाजिक कार्यकर्ते अजय चव्हाण, संजय लोहकरे, तेजराज भसारकर, विशाल डुंबेरे यांच्यासह अनेक तरुण तरुणीची उपस्थिती होती.




0 Comments