महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष जितेंद्र चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त बल्लारपूर तालुका संघातर्फे ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप : नगरसेवक स्वामी रायबरम व प्रसिध्द कवी संजय लोहकरे यांची उपस्थिती
बल्लारपूर(राज्य रिपोर्टर) : आज 2021 या वर्षांचा पहिला दिवस मागील वर्षी कोरोनाच्या वैश्विक महामारीने संपूर्ण जगाला वेठीस धरले होते.
मात्र कोरोना यावर मात करून नव्या वर्षात नव्या उमेदीने जगायचे आहे व या उदात्त हेतुने व नवीन वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मा.वसंत मुंडे व राज्य सरचिटणीस मा.विश्वासराव आरोटे तसेच चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष मा.जितेंद्र चोरडिया यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा बल्लारपूरच्या वतीने ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथील रूग्णांना फळ वाटप करण्यात आले.
यावेळी बल्लारपूर नगर परिषदेचे नगरसेवक स्वामी रायबरम, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन मेश्राम, व प्रसिध्द कवी संजय लोहकरे यांची उपस्थिती.
होती यावेळी उपस्थित रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले यावेळी बल्लारपूर तालुका संघाचे तालुकाध्यक्ष मुन्ना खेडकर, कार्याध्यक्ष मनोहर दोतपेल्ली, सचिव विशाल डुंबेरे, दिपक भगत, देवानंद देशभ्रतार, वसंत मुन, राजू राठोड, धनंजय पांढरे, शितल बेताल, श्रीनिवास सिंगाराव, विजय माटे ई ची उपस्थिती होती.







0 Comments