मुंबई हल्ल्यातील शहिदांना घुग्घुस काँग्रेस तर्फे श्रद्धांजली अर्पित ।।
घुग्घुस(राज्य रिपोर्टर) : 26 नोव्हेंबर 2008 रोजी पाकिस्तान येथून आलेल्या दहशतवाद्यानी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, हॉटेल ताज, नरिमन पॉईंट, हॉटेल ओबेरॉय व अन्य ठिकाणी घुसून शेकडो निरपराध लोकांची जीवे घेतली या दहशतवाद्यांशी नागरिकांचे व मुंबईचे रक्षण करतांना दहशतवादी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, तुकाराम ओंबाळे, विजय साळसकर, अशोक कामठे, मेजर संदीप उन्नीकृष्णन यासह अन्य सैनिकांना भारतमातेच्या विरपुत्राना वीरमरण आले.
दिनांक 26 नोव्हेंबर रोजी घुग्घुस काँग्रेस कार्यलयात भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या शूरवीराना व निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी, कामगार नेते सैय्यद अनवर, अजय उपाध्ये, शहजाद शेख, संजय कोवे, रोशन दंतलवार, सुनील पाटील, अंकुश सपाटे, रंजित राखूनडे, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.



0 Comments