चंद्रपुरात ओबीसी समाजाच्या मोर्चाला सुरुवात : मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त
चंद्रपूर(राज्य रिपोर्टर) : ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे तसेच ज्या प्रमाणे कुत्र्या मांजराचीच नव्हे तर पशु पक्षीचीही गणना होते तिथे ओबीसी समाजाची जणगणना होत नसून हा समाज स्वातंत्र्याच्या 73 वर्षांनंतरही अनेक सोयीसुविधा पासून वंचीत आहे इतकेच नव्हे तर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान तयार करतांना अनुसूचित जाती व जनजातींना आरक्षण देण्यापूर्वी भारतीय घटनेच्या 340 व्या कलमानुसार ओबीसींना आरक्षण दिले आहे.
मात्र आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाची योग्य त्याप्रकारे अमलबजावणी केली नाही याच अनुषणगाने ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी या मागणीसाठी चंद्रपुरात 26 नोव्हेम्बर 2020 ला ओबीसी समाजाच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या मोर्चाला डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी याठिकानावरून दुपारी 1:00 वाजताच्या सुमारास सुरुवात झाली तत्पूर्वी आज संविधान दिनाच्या निमित्ताने संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले असून सदर मोर्चा रामनगर चौक - जटपुरा गेट- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून गांधी चौक - कस्तुरबा चौक - ज्यूबली हायस्कूल - जटपुरा गेट - प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौक मार्ग न्यू इंग्लिश स्कूल च्या पटांगणावर सदर मोर्चाचा समारोप होणार आहे सदर मोर्चा ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी, मराठा समाजाला आरक्षण ओबीसी कोट्यातून देण्यात येऊ नये, ओबीसी समाजातील नागरिकांची नोकरी-शिक्षणाच्या आरक्षण संदर्भातील अन्याय दूर करण्याची मागणी या निमित्ताने करण्यात येणार आहे ओबीसी समाजाच्या मोर्चाला जिल्ह्यातूनच नव्हे तर अनेक जिल्ह्यातून ओबीसी बांधवांनी हजेरी लावली आहे या मोर्चात महिला-पुरुषांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती आहे या मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून आयोजक कोरोना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देत आहे तसेच सोशल डिस्टनसिंग पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.




0 Comments