डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहावर हल्ल्याच्या आरोपींना तात्काळ जेरबंद करून कठोरातील कठोर शिक्षा द्यावी :- शंकर महाकाली
बल्लारपुर (राज्य रिपोर्टर) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई येथील निवास्थान "राजगृह'हे आंबेडकरी अनुयायांसाठी पवित्र व प्रेरणादायी असून मंगळवार दिनांक सात जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास दोन विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तींनी राजगृहावर हल्ला केल्याने या घटनेचा जाहीर निषेध असून आरोपींना तात्काळ जेरबंद करून कठोरातील कठोर शिक्षा करावी अशी मागणी राहुल गांधी विचार मंच शहर अध्यक्ष शंकर महाकाली यांनी केली आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजगृह हे खास पुस्तकासाठी उभारले होते. याठिकाणी दररोज जगभरातील आंबेडकरी अनुयायी तथा हितचिंतक दर्शनासाठी ये-जा करीत असतात.राजगृह हे अत्यंत महत्त्वाचे आणि पवित्र स्थान असून या पवित्र स्थानाला दोन समाजकंटकांनी धक्का लावण्याचा प्रयत्न करून राजगृहा वरील भाड हल्ला केल्याने या घृणास्पद कृत्याने आमच्या आंबेडकरी अनुयाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यामुळे तात्काळ आरोपीचा शोध घेऊन जेरबंद करण्यात यावे आणि कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी शंकर महाकाली यांनी करून असे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाही व सदर घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून आंबेडकरी अनुयायांना न्याय द्यावा अन्यथा आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही अशा इशाराही दिला आहे.



0 Comments