मुंबईतील महामानवाच्या निवासस्थान असलेल्या राजगृहाची तोड़फोड़ करणाऱ्या समाजकंटकाला त्वरित अटक करा : बल्लारपुर शहर विकास आघाडी ची मागणी


मुंबईतील महामानवाच्या निवासस्थान असलेल्या राजगृहाची तोड़फोड़ करणाऱ्या समाजकंटकाला त्वरित अटक करा : बल्लारपुर शहर विकास आघाडी ची मागणी     

बल्लारपुर(राज्य रिपोर्टर) : प्रज्ञासूर्य महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर ज्यानी अंधाऱ्या वस्तीत दिव्याच्या प्रकाशाखाली ज्ञानसाधना केली ज्यानी केवळ पुस्तकासाठी घर बांधले केवळ घरच नाही बांधले तर जगातील सर्व विषयावरील ग्रंथसंपदा आपल्या ग्रन्थालयात संग्रहित केली.

 अशा या विद्वान महामेरुच्या घरावर अज्ञात माथेफिरूने तोड़फोड़ केली व देशातल्या तमाम आंबेडकरी अनुयायाच्या भावना दुखावल्या याविषयीच्या सविस्तर माहितीनुसार ०७ जुलै २०२० ला मुंबई येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवास असलेल्या 'राजगृह' या ऐतिहासिक इमारतीच्या सीसीटीवी कैमेरा व कुंडयाची तोड़फोड़ करून समाजात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
 बाबासाहेबांच्या सविधानामुळे या देशात सामाजिक समता व न्याय व बंधुता अस्तित्वात असतांना असे अनैतिक कृत्य करून समाजात अशांतता निर्माण करणाऱ्या समाज कंटकाला त्वरित अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी बल्लारपुर शहर विकास आघाडी तर्फे तीव्र निषेध नोंदवून करण्यात आली आहे.
 तसेच या संदर्भात मा.तहसीलदार बल्लारपुर यांच्या मार्फ़त राज्याचे मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे व गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांना निवेदन देवून या समाजकंटकाना त्वरित अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे सदर निवेदन देताना शहर विकास आघाडीचे अध्यक्ष भारत थुलकर,  सचिव संजय डूम्बेरे, मुन्ना दिगवा, सरफराज शेख, बाबाभाई, प्रा वासुदेव कांबळे, अरुण लोखंडे, विट्ठल भगत, वामन कांबळे, आसिफ़ शेख, सय्यद अजहर अली ई ची उपस्थिति होती.

Post a Comment

0 Comments