चिमूर कॉटन इंडस्ट्रीज मधील घटना
महिला कामगार उजवा हात चकनाचूर
चिमूर,(राज्य रिपोर्टर) : चिमूर कॉटन इंडस्ट्रीज येथिल कामगार महिला मीरा राजू सहारे वय अंदाजे ३५ वर्षे रा.चिमूर यांचा काम करीत असतांना मशीनमध्ये हात गेल्याने उजवा हात चकनाचूर होऊन तुटून मशीनमध्ये पडल्याने त्या महिलेला उपचारासाठी उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे दाखल करण्यात आले. जखमी कामगार महिलेचा तात्पुरत्या स्वरूपात उपचार करण्यात आला.
कामगार महिला हि गंभीर जखमी अवस्थेत असल्याने जिवितास धोका होऊ नये म्हणून पुढील उपचारास नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले.हि घटना दि.३/७/२०२० सायंकाळी ०५:३० वाजताच्या दरम्यान घडली असून अनेक दिवसांपासून हि महिला चिमूर कॉटन इंडस्ट्रीज मध्ये कामगार पदावर कार्यरत आहे.
घटना पहिल्यांदाच चिमूर शहरात घडली असून चिमूर तालुक्यात ३ कापूस जिनिंग आहे.



0 Comments