पुरोगामी पत्रकार संघातर्फे पत्रकारांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव


पुरोगामी पत्रकार संघातर्फे पत्रकारांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव

बल्लारपूर (राज्य रिपोर्टर) : कोरोनावर मात करण्यासाठी संपूर्ण राज्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या पोलीस  कर्मचारी,आरोग्य विभागातील कर्मचारी,डॉक्टर्स,सफाही कामगार यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव करण्यात आला.मात्र,पत्रकारांची दखल कोरोना योद्धा म्हणून कुणी घेतली नाही.
राज्यातील तमाम पत्रकारांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या भूमिका वेळोवेळी मांडल्या.तरीही शासकीय-प्रशासकीय स्थरावर त्याची दखल घेण्यात आली नाही.महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांच्या आदेशा नुसार बल्लारपूर शहरात काही पत्रकारांना कोरोना योद्धा म्हणून नुकतेच गौरविण्यात आले.यात प्रामुख्याने  जेष्ठ पत्रकार वसंत खेडेकर,पत्रकार अजय दुबे,मंगेश बेले,भाजप नेते काशी सिंग यांच्या गौरव करण्यात आला.
या प्रसंगी पुरोगामी पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर,चंद्रपूर जिल्हा प्रभारी सुजय वाघमारे,संघाचे पदाधिकारी शंकर महाकाली,प्रशांत रणदिवे,राकेश कांबळे,विकास दुपारे आवर्जून उपस्थित होते.पुरोगामी पत्रकार संघाने पत्रकारांची दखल घेतल्यामुळे पत्रकार वर्तुळात पुरोगामी पत्रकार संघाच्या कार्याची दखल घेण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments