बल्लारपुर कारवां मार्गावर बिबट आढळला : दुचाकी स्वाराना लक्षपूर्वक प्रवास करावा


बल्लारपुर कारवां मार्गावर बिबट आढळला : दुचाकी स्वाराना लक्षपूर्वक प्रवास करावा       

 बल्लारपुर(राज्य रिपोर्टर) : बल्लारपुर शहर हे निसर्ग साधन संपत्ति ने परिपूर्ण असलेले शहर आहे तसेच महाराष्ट्रातील वाघासाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प सुध्दा काही अंतरावर आहे व देशविदेशातिल पर्यटक ताडोबाच्या भ्रमती साठी बल्लारपुर शहरातूनच जात असतात बल्लारपुर शहराला सुध्दा जंगलाचा वारसा लाभला आहे.

 बल्लारपुर लगत कारवा व जूनोना जंगल लागून असून या अंतर्गत अनेक वन्य प्राण्याचे वास्तव्य आहे व पाण्याच्या शोधात अनेक वन्य प्राणी नागरी वस्ती कड़े येत असतात अशाच प्रकारची घटना बल्लारपुर कारवा मार्गावर घडली वनविभागाच्या भिंतिवर काही नागरिकांना बिबट फिरताना आढळून आला त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे बल्लारपुर कारवा जूनोना मार्गाने अनेक दुचाकी वाहन चालक जात असतात यामुळे अशाना चिंता वाटत आहे त्यामुळे वेळीच वनविभागाने बिबटयाला जेरबंद करून नागरिकांच्या मनातून भीती दूर करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments