लाॅकडाऊन काळातील तीन महिन्याचे वीज बिल माफ करण्यात यावे:- राजु झोडे


लाॅकडाऊन काळातील तीन महिन्याचे वीज बिल माफ करण्यात यावे:- राजु झोडे

तहसीलदार मार्फत ऊर्जामंत्री यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली

 बल्लारपूर,(राज्य रिपोर्टर) :  यावर्षी कोरोनाच्या महासंकटात सर्वसामान्य व गरीब जनतेचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. सर्वसामान्य व गरीब जनतेला लाॅकडाऊन च्या काळात हाताला काम नसल्यामुळे आपले व आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यास फार अडचण जात आहे. शेतकरी, मजूर, कामगार व सर्वसामान्य नागरिक यांना मागील तीन महिन्याच्या काळात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला व आताही करावा लागत आहे. त्यामुळे मागील तिन महिन्याचे वीज बिल सरकारने माफ करावे अथवा एकाच वेळी तीन महिन्याचे वीज बील न देता टप्प्याटप्प्याने विज बिल  देण्यात यावे. करिता उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी तहसीलदार बल्लारपूर यांचेमार्फत ऊर्जामंत्री यांना निवेदन देऊन मागणी केली.
          लाॅकडावून च्या काळातील मागील तीन महिन्याचे वीज बिल  सरकारने तात्काळ माफ करावे किंवा स्लॅब नुसार टप्प्याटप्प्याने वीजबिल द्यावे अन्यथा उलगुलान संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे, संपत कोरडे,सचिन पावडे, मनोज बेले, भुषण पेटकर, अनिरुप पाटिल आदि कार्यकर्ता यांनी संबंधित प्रशासनाला निवेदन दिला.


Post a Comment

0 Comments