पोलिस ठाण्याची सुसज्ज इमारत पोलीस व नागरिकांमधील एक मधुर संवादाचे केंद्र बनावे : खासदार बाळू धानोरकर


पोलिस ठाण्याची सुसज्ज इमारत पोलीस व नागरिकांमधील एक मधुर संवादाचे केंद्र बनावे : खासदार बाळू धानोरकर 

माजरी पोलिस ठाण्याच्या नवीन सुसज्ज इमारत व पोलीस वसाहतीचे  पालकमंत्री विजय वड्डेटीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते लोकार्पण

चंद्रपूर (राज्य रिपोर्टर) : जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पोलीस विभागाने कार्य केले पाहिजे. सुसज्ज इमारत असायला हवी यासाठी खासदार बाळू धानोरकर हे नेहमी आग्रही होते. ते आमदार असतांना भद्रावती आणि माजरी येथे नवीन इमारत होण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्याची दखल शासनाने घेत दोन्ही पोलीस ठाणे अत्याधुनिक करण्याकरिता निधी मंजूर केला. मांजरी येथील ग्रामस्थांना दिलेली भेट हि एक वास्तू म्हणून न राहता पोलीस व नागरिकांमधील एक मधुर संवादाचे केंद्र बनायला हवे असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. 

              यावेळी पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले, आमदार प्रतिभाताई धानोरकर, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, निलेश पांडे, सदाशिव ढाकणे, कार्यकारी अभियंता संतोष जाधव, उपविभागीय अभियंता कोरे, कॉग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, बसंत सिंग, माजी सरपंच गोर्रा कुंभ्राय्या, इंटकचे ईश्वरानंद सिंग, सदलवार, जायनारायण यादव यांची उपस्थिती होती.       
जिल्ह्यातील पोलीस विभागातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी मी कटीबद्ध आहे. माजरी पोलीस ठाण्यासाठी लागणार निधी मी लवकरच उपलब्ध करून देईल. येत्या काळात पोलीस विभागातील अन्य पोलीस ठाण्याचे काम करण्यात येईल असे मत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.  
 पोलिस विभागाचा नागरिकांसोबत संवाद वाढविण्याच्या दृष्टीने खासदार बाळू धानोरकर हे नेहमी आग्रही राहिले आहेत. पोलिस ठाणे देखील अत्याधुनिक व सुसज्ज राहण्यासाठी तत्कालीन आमदार व विद्यमान खासदार बाळू धानोरकर नेहमी पाठपुरावा करीत आपली पोलिसांप्रती आपुलकी दाखवीत आले आहे. आमदार असताना त्यांनी भद्रावती व माजरी येथे अत्याधुनिक पोलिस ठाणे बनविण्यासाठी पाठपुरावा केला होता. भद्रावती पोलीस ठाणे बनून सेवेत आहे. परंतु माजरी पोलिस ठाणे अद्याप पूर्ण झाले नाही. त्यामुळे लोकांच्या सुविधेसाठी पोलिस ठाण्याची सुसज्ज इमारतीच्या उपयोग झाला पाहिजे असे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. ते माजरी येथील पोलीस ठाण्याच्या सुसज्ज इमारतीच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी बोलत होते.
आजवर जुन्या इमारतीमध्ये काम सुरु होते. त्यामध्ये नागरिकांना व पोलीस अधिकाऱ्यांना काम करण्यास अतिशय त्रासदायक होत होता. नागरिकांच्या मागणी नुसार नवीन पोलीस ठाण्याची इमारतीचे काम सुरु केले. खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रत्नानुसार हे काम पूर्ण झाले असून मांजरी येथील ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.

Post a Comment

0 Comments