शेतीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्या : आमदार प्रतिभाताई धानोरकर


शेतीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्या : आमदार प्रतिभाताई धानोरकर 

चंद्रपूर(राज्य रिपोर्टर) : माेठया प्रमाणात कापुस व सोयाबीनची पिके प्रामुख्यांने घेण्यात येते. परंतु बि-बियाणे बोगस निघल्याने ती उगवलीच नसल्याची गंभीर बाब समाेर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. हि गंभीर बाब असून याची दाखल घेत आमदार प्रतिभाताई धानोरकर घ्या स्वतः अधिकाऱ्यांना घेऊन भद्रावती तालुक्यातील शेतीत दाखल झाल्या. 

त्यांनी शेतीची पाहणी करून अधिकाऱ्यांना या नुकसानग्रस्त शेतीच्या भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याचे आदेश दिले. त्याच प्रमाणे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी बोगस  बि-बियाणे देणाऱ्यांवर खटले दाखल करा असे निर्देश आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिले. 
यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी आर.टी.जाधव, तालुका कृषी अधिकारी  व्ही.आर.प्रकाश ,  तालुका कृषी अधिकारी मोहिनी जाधव,  कृषी अधिकारी सुशांत गाडेकर, मंडळ कृषी अधिकारी झाडे, मंडळ कृषी अधिकारी कोमती, विस्तार अधिकारी कृषी डोरलीकर,  विस्तार अधिकारी कृषी अधिकारी राठोड, कृषी पर्यवेक्षक कोसुरकार, प्रशांत काळे ,प्रवीण बाणदूरकर,गोकुळ रोडे व ग्रामीण भागातील शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 
                                 आमदार प्रतिभाताई धानोरकर यांना याबाबत शेतकऱ्यांच्या  तक्रारी प्राप्त झालेल्या असुन शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापुस या पिकांची पेरणी केलेली आहेत. परंतु कृषी केंद्राकडून घेण्यात आलेली बि-बियाणे ही बोगस असल्यामुळे ती उगवलेली नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे फार माेठे प्रमाणात नुकसान झालेले आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भावामुळे आधीच शेतकरी हा फार माेठ्या विवंचनेत सापडलेला आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे सव्र्हे करून शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी किंवा तात्काळ बि-बियाणे उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी कृषीमंत्री दादाजी भुुसे यांना केली आहे.

Post a Comment

0 Comments