विविध संघटना मार्फत कोरोना योद्धाचा सत्कार


विविध संघटना मार्फत कोरोना योद्धाचा सत्कार
राजुरा,(राज्य रिपोर्टर) राकेश कलेगुरवार : कोरोना प्रादुर्भाव माहामारी काळात अत्यंत बिकट परिस्थितीत काम करणाऱ्या कोरोना योद्धाचे राजुरा शहरात विविध सामाजिक संघटना तर्फे सत्कार करण्यात आले.
        कोरोना रोगाचा प्रादुर्भाव मुळे जिवीत हानी सोबत आर्थिक संकट देशासमोर उभे झाले. जवळपास सर्वच देशाने ताळेबंदी लागू करून या महामारी रोगावर नियंत्रण करण्याचे अटोकाट प्रयत्न करत आहे.ताळेबंदी काळात. देशवासीयांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात आले. यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाले. तसेच कोरॉना रुग्णावर उपचार करणे हे देखील डॉक्टर पुढे आव्हान होते.  अशा बिकट परिस्थिती डॉक्टर, पोलिस, नगर प्रशासन तसेच विविध सामाजिक संघटना  अहोरात्र कष्ट घेतले. अश्या समाजसेवाकांचे राजुरा शहरात जे .सी .आय.राजुरा रॉयल, जमीला  बेगम बहुद्देशीय संस्था आणि छावा ग्रुप सोंडो च्या वतीने सत्कार करण्यात आले. यात जे .सी .आय.राजुरा रॉयल, चे अध्यक्ष सुषमा शुक्ला, जमीला  बेगम बहुद्देशीय संस्था चे अध्यक्ष जाकिर् सय्यद, छावा ग्रुप सोंडो चे अध्यक्ष असिफ सैय्यद, शिक्षक स्वतंत्र कुमार शुक्ला यांनी पुढाकार घेऊन कोरोना योद्धाचे सत्कार करण्यात आले.

Post a Comment

0 Comments