हद्य़विकारावरील संशोधनासाठी प्रयोग शाळा अद्यावत करने


हद्य़विकारावरील संशोधनासाठी प्रयोग शाळा अद्यावत करने 

बल्लारपूर,(राज्य रिपोर्टर) : बल्लारपूर शहरातील किल्ला वार्ड येथील स्थायिक असलेले स्व. श्री. बबनराव उपगन्लावार यांचे चिरंजीव डाॅ.अमन उपगन्लावार यांना अखिल भारतीय तंञशिक्षण परिषद,नवी दिल्ली या उच्च शिक्षणातील शिखर संस्थेकडून नुकताच प्रकल्प सादरीकरणासाठी रु. १२,५०,००० /- इतका निधी मंजूर करण्यात आला.
   डाॅ.अमन उपगन्लावार हे सध्या महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेञात अग्रणी असलेल्या श्री नेमिनाथ जैन ब्रहमाचर्याश्रम संस्थेच्या श्रीमान सुरेशदादा जैन औषधनिर्माण महाविदयालय,चांदवड येथे फार्माकाॅलोजी या विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. सदर प्रकल्पाचा कालावधी हा दोन वर्षाचा असून या काळात या प्रकल्पाद्वारे ते प्रयोगशाळेचे नुतनीकरण अत्यानुधिक उपकरणांद्वारे करणार आहे. या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी डाॅ.अमन उपगन्लावार यांना संस्थापरिवार तसेच विविध क्षेञातील मान्यवरांकडून शुभेच्छा देऊन  त्यांचे सर्वञ अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

1 Comments