मोदींनी १३० कोटी जनतेची माफी मागावी : खासदार बाळू धानोरकर
चंद्रपूर काँग्रेस कमिटी तर्फे 'शाहिदो को सलाम' दिवस
चंद्रपूर (राज्य रिपोर्टर): गेल्या सहा वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांना १८ वेळा भेटले, आंतर राष्ट्रीय मुत्सद्दीगिरीत आपण फार हुशार आहात, मोदीजी तर मग साबरमती आश्रमात झुला झुलुन देखील जिनपिंग यांनी आपल्याला हा धोका का दिला?? जे सैनिक देशासाठी शाहिद झाले त्यांचा आम्हाला अभिमान आहे. पण ते ज्या कारणांसाठी शाहिद झाले. ते कारण तुम्ही का लपवत आहात? एवढ्या भेटी गाठी घेऊन देखील आपल्या मैत्रीची कोणतीही तमा चीनने बाळगली नाही?? चीन ने वेळोवेळी भारताला धोका दिला आहे. ही बाब स्पष्ट असताना देखील आपण आज ही सत्य परिस्थिती कबुल का करत नाही आहात?
भारताचा एक इंच भाग देखील चीनच्या ताब्यात नाही. हा जो खोटेपणा मोदींनी केला आहे. त्यासाठी मोदींनी देशाची जाहीर माफी मागितली पाहिजे. शहिदांच्या कुटुंबाच्या भावनांची जर मोदींना पर्वा असेल तर भारताचे राष्ट्र प्रमुख या नात्याने तुम्ही १३० कोटी जनतेची माफी मागावी असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. केंद्रातील मोदी प्रणित सरकारच्या विरोधात देशव्यापी जन आंदोलन उभारण्याकरीत आज चंद्रपूर शहर व ग्रामीण काँगेस तर्फे राज्य भरात 'शाहिदो को सलाम' दिवस पाळला त्यावेळी ते बोलत होते.
चंद्रपूर शहर व ग्रामीण काँगेस कमिटी तर्फे स्थानिक गांधी चौक येथे शहिदांना श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी आमदार, प्रतिभाताई धानोरकर, शहर जिल्हा अध्यक्ष रितेश(रामु)तिवारी, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष प्रकाश देवतळे, महिला जिल्हा अध्यक्ष चित्रा डांगे, विनोदजी दत्तात्रय, कामगार नेते के के सिंगजी, गटनेते मनपा डॉ महाकुलकर, सेवादल जिल्हाध्यक्ष नन्दूजी खनके, घनश्यामजी मूलचंदानी,वरोरा शहर अध्यक्ष विलास टिकले, महिला शहर अध्यक्ष सुनीता अग्रवाल,करीम शेख बल्लारशा, नगरसेवक नंदू नागरकर, नगरसेविका सुनीता लोढीया,सोहिल शेख,अनिलजी शिंदे,माजी नगराध्यक्ष भास्कर माकोड़े, दिलीप मकोड़े, देवेंद्र आर्या, युसूफभाई हुसैन, एन. एस. यु. आय प्रदेश महासचिव कुणाल चहारे, युवक जिल्हा अध्यक्ष हरीश कोत्तावार,माजी जिल्हाध्यक्ष शिवा राव, एन. एस. यु. आय जिल्हाउपाध्यक्ष यश दत्तात्रय, युवक शहर अध्यक्ष राजेश अड्डर,अल्पसंख्यक जिल्हाध्यक्ष ऍड. मलक शाकिर,शहर अध्यक्ष अल्पसंख्यक सुलेमान अली, जिल्हाध्यक्ष अनुताई दहेगावकर, प्रिया चंदेल, परवीन सय्यद, माजी नगरसेविका एकता गुरले, माजी नगरसेवक प्रसन्न शिरवार,दुर्गेश कोडाम, गोविंदा अमृतकर, पप्पू सिद्दीकी, अनीश राजा, राजू वासेकर, रुचित दवे, सूर्या अड़बाले, केतन दुरसेल्वार,अन्नू जंगम, आकाश तिवारी, रमिज शेख, अतीक राजा, इमरान खान, मिनल शर्मा यांची उपस्थिती होती.
देशात या घटनेचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. चीनला धडा शिकविण्याची हि वेळ आहे. पुढे देखील अशा घटना होऊ नये. कोणाचे पण कुटुंब उघड्यावर पडू नये. त्याकरिता चीनवर कारवाई करण्याची गरज आहे. असे मत आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्षात भारताचे २० जवान शाहिद झाले. सीमेवरील तणावाचे पडसाद देशभर उमटत असून, चीनविरोधात संतापाची लाट उसळत आहे. चीन वस्तूवर बहिष्काराच्या मागणीने जोर धरला आहे. परंतु चीन संदर्भात आणखी कठोर पाऊले केंद्र सरकारने उचलावी असे मत खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केले. त्यासोबतच केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशाचे प्रचंड नुकसान होत आहे. देश संकटात आहे, त्या चुकीच्या धोरणाचा निर्णयाचा निषेध म्हणून केंद्रातील मोदी प्रणित सरकारच्या विरोधात देशव्यापी जन आंदोलन उभारण्याकरीत आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तर्फे राज्य भरात 'शाहिदो को सलाम' दिवस आज पळला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अन्य मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली.



0 Comments