गरीबांची रेल्वे 12 ऑगस्ट पर्यंत लॉकडाउनच : कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे रेल्वेचा निर्णय


गरीबांची रेल्वे 12 ऑगस्ट पर्यंत लॉकडाउनच : कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे रेल्वेचा निर्णय 

ग्रामीण भागाशी नाळ जोडनारी पैसेंजर रेल्वे प्रवाशांना अजूनही वाट पहावी लागणार


 बल्लारपुर (राज्य रिपोर्टर)दिपक भगत : देशभरात वाढत असलेल्या कोरोना संसर्गजन्य रोगामुळे व सतत वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे देशभरातील सर्व नियमित मेल, एक्सप्रेस व उपनगरीय रेल्वेगाड्यांची वाहतूक  12 ऑगस्ट पर्यन्त बंद ठेवन्याचा निर्णय भारतीय रेल्वे ने घेतला असल्याची माहिती आहे 24 मार्चला केंद्र सरकारने देशव्यापी लॉकडाउन ची घोषणा केली व तेव्हापासुनच रेल्वे ची सर्व प्रवासी गाड्यांची वाहतूक बंद आहे यामुळे असा तर निष्कर्ष काढता येणार नाही ना कि वाढत्या कोरोनाच्या संक्रमनामुळे केंद्र सरकार या 45 दिवसांच्या कालावधीत काही मोठे निर्णय घेण्याच्या तयारित तर नाही? या काळात केवळ अत्यावश्यक सेवतील कर्मचारी वर्गासाठीच रेल्वे गाड्या चालतील असे संकेत आहेत. या दरम्यान 1 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान च्या काळातील प्रवासासाठी करण्यात आलेली सर्व आरक्षण रद्द करण्यात आली आहेत व प्रवाशांचे पैसे परत करण्यात येणार असून ऑनलाइन आरक्षण केलेल्या प्रवाशांचे पैसे बैंकेत त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत यामुळे नोंकरदार वर्गाला तर फ़टका बसणार आहेच शिवाय गोरगरीब व जनसामान्याची रेल्वे अजूनही 45 दिवसापर्यंत बंद राहण्याची शक्यता आहे. सामान्य नागरिकांच्या मते कोरोना हा संसर्गजन्य रोग परदेशांतुन भारतात आला विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय विमानसेवे दवारे भारतातील मोठ्या शहरात कोरोनाचा प्रसार झाला व त्यांच्या माध्यमातुन ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार झाला ज्यासेवेमुळे कोरोना भारतात आला ती विमानसेवा हळूहळू पूर्वपदावर येत असतांना भारतीय रेल्वे व धक्कादायक रित्या निर्णय घेताना 12 ऑगस्ट म्हणजे अजूनही 45 दिवस रेल्वे सेवा बंद ठेवन्याचा निर्णय घेतला आहे यामुळे ग्रामीण भागाशी नाळ जोडनारी पैसेंजर रेल्वे प्रवाशांना अजूनही वाट पहावी लागणार आहे शिवाय कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे जिल्ह्याची सिमा बंद असल्यामुळे अनेकांचा परगावी जाण्यावर नियंत्रण ठेवावे लागले एकंदरित देशभरात दररोज वाढत जाणाऱ्या कोरोना रुग्ण संख्येमुळे  नागरिकांनी फिजिकल डिस्टेंसिग पाळावे व रेल्वे प्रवासातून तरी कोरोनाचा संसर्ग वा प्रसार होवू नये यासाठी तर रेल्वे ने असा धाड़सी निर्णय तर घेतला नाही ना अशी चर्चा जनसामान्य नागरिक करीत आहेत.

Post a Comment

0 Comments