मोठ्या गड्ड्यात पडुन मजुर महिलेचा मृत्यू
रेती तस्करांवर कारवाही करा मृतक महिलेच्या पतीची मागणी.
कंत्राटदाराकडुन याच चोरीच्या रेतीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.
रेतीच्या अवैध उत्खननाचा परिणाम; मोठ्या गड्ड्यात पडुन मजुर महिलेचा मृत्यू
चंद्रपूर (राज्य रिपोर्टर): चंद्रपुर येथील राष्ट्रवादीनगरातील नालीच्या बाजुला रेतीच्या अवैध उत्खननातुन निर्माण झालेल्या तलाव सदॄश्य गड्ड्यात दरड अंगावर कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.लखमापुर परीसरातील एक मजुर महीला शुक्रवारी रोजी सकाळी त्या गढ्ढयाची दरड कोसळुन दुदैवीपणे त्यात मरण पावली.
मागील काही महीन्या पासुन राष्ट्रवादी नगर मधील नाल्याजवळच्या रेतीचे उत्खनन करुन ती रेती तेथीलच राष्ट्वादी नगर, तुलसीनगर वृंदावन नगर परीसरात विकण्याचा गोरखधंदा सुरु आहे.
त्याच परीसरात चंद्रपुर महाऔष्णीक विज निर्मीती केंद्र असुन त्याच्या संरक्षण भितींचे उंचीकरण आणी दुरुस्तीचे जे मोठे काम सुरु आहे त्यासाठी सुध्दा कंत्राटदाराकडुन याच चोरीच्या रेतीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.
सदर रेती अतीशय मातीमिश्रीत रेती असुन कंत्राटदार त्या कामाकरीता येथील चोरी सोबतच चंद्रपुर महाऔष्णीक विज निर्मीती केंद्राच्या कामाचा दर्जाही खराब करीत असल्याचेही सहजपणे लक्षात येत आहे.
सदर महीलेच्या मृत्युस कारण ठरलेल्या त्या रेतीचोरांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवुन कारवाई करण्याची गरज आहे.
चंद्रपुर महाऔष्णीक विज निर्मीती केंद्राच्या सरंक्षण भिंतीच्या करोडोंच्या बांधकामाचे कंत्राट सुभाष कासनगोट्टुवार या कंत्राटदार एजन्सीचे आहे हे विशेष.
“रेती तस्करांवर कारवाही करा मृतक महिलेच्या पतीची मागणी.
रेती तस्करांनी अवैध उत्खनन करुन विचोडा ते कोसारा गावाचा इरई नदीच्या पात्रा जवळ मोठ मोठे गड्डे दिसतात. यामुळे आमचे दुधाळु जनावरे यात पडतात व महिला ही यात अनेकदा पडल्या आता माझ्या पत्नीचा मृत्यु रेती तस्करांनी खोदलेल्या गड्ड्यात झाला आहे. त्यामुळे प्रशाशनाने व तहसीलदारांनी या रेती तस्करांवर कारवाही करुन पोलीसांत गुन्हा दाखल करावा अशी मागणी – शंकर कोडापे यांनी केली आहे.”



0 Comments